Tuesday, October 15, 2024

नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार: जुना मोंढा भागातील घटना; गोळीबार करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- जुन्या वादातून जुना मोंढा भागातील शारदा टॉकीज रस्त्यावर एका सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. सराफा व्यापारी जखमी झाला असून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास अटक केली आहे.

शारदा टॉकीजसमोर पाठक गल्ली भागातील सराफा व्यापारी सचिन पंढरीनाथ कुलथे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आरोपी गजानन बालाजी मामीडवार याने दुचाकीवर येऊन ही फायरिंग केली. यात सचिन कुलथे याच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, वजिराबादचे जगदीश भंडरवार, उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, मुदखेडचे राजू वटाणे, वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे एपीआय संजय निलपत्रेवार आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.

गोळीबार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून जखमीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून फायरिंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सचिन कुलथे हे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी याठिकाणी आले होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!