Thursday, June 1, 2023

नांदेडसह राज्यभरातील न्यायाधीशांच्या बदल्या; नांदेड जिल्ह्यातून ३१ न्यायाधीश जाणार तर २७ नवीन न्यायाधीश जिल्ह्यात येणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– राज्यातील एकूण एक हजार १३ न्यायाधीशांच्या सार्वत्रिक बदल्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहेत. यामध्ये २४७ जिल्हा न्यायाधीश, २३३ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि ५३३ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आदेशावर उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एम. डब्ल्यू. चांदवाणी यांची स्वाक्षरी आहे. यात नांदेड जिल्ह्यातून ३१ न्यायाधीश बदलून इतरत्र जाणार आहेत तर २७ नवीन न्यायाधीश नांदेड जिल्ह्यात येणार आहेत.

नांदेड येथून बदलून जाणारे जिल्हा न्यायाधीश आणि त्यांची नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे :

कमलकिशेार गौतम- औद्योगिक न्यायालय पुणे, कंधार येथील ए. एस. सलगर- सीटी सिव्हील कोर्ट मुंबई, कुटूंब न्यायालयातील एन. डी. खोसे- गोंदिया, मुखेड येथील एन. पी. त्रिभुवन- सीटी सिव्हील कोर्ट मुंबई, बिलोलीचे डी. आर. देशपांडे- संगमनेर जि. अहमदनगर.

नांदेड येथे येणारे जिल्हा न्यायाधीश पुढीलप्रमाणे :

श्रीमती एम. ए. आनंद- पनवेल रायगड (कंधार), डी. ई. कोठालीकर- मुंबई (बिलोली), सी. व्ही. मराठे- मुंबई (नांदेड), श्रीमती एस. बी. महाले- मुंबई (कंधार), श्रीमती एस. पी. अग्रवाल- मुंबई (नांदेड कुटूंब न्यायालय).

नांदेड येथून बदलून जाणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुढीलप्रमाणे :

विधीसेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे (अहमदनगर), सचिन सुर्यकांत पाटील (कामगार न्यायालय अमरावती), मुखेड येथील एस. टी. शिंदे (नागपूर), भोकर येथील एम. पी. पांडे (अहमदनगर), एम. पी. शिंदे (पुणे), मयुरा यादव (अमरावती), एम. बी. कुलकर्णी (नाशीक).

नांदेड येथे येणारे नवीन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुढीलप्रमाणे :

ए. ए. पाचभाई – मुंबई अंधेरी (भोकर), वाय. बी. गमे- मुंबई (मुखेड), श्रीमती ए. के. मांडवगडे- अहमदनगर (नांदेड), श्रीमती के. पी. जैन- सोलापूर (नांदेड), डी. एम. नागपूर (नांदेड), आर. बी. राजा- वर्धा (नांदेड), श्रीमती आर. आर. लोहिया- वर्धा (नांदेड).

नांदेड येथून बदलून जाणारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुढीलप्रमाणे :

पी. जी. तापडीया- नांदेड (पुणे), एस. जी. बर्डे- देगलूर (पुणे), डब्ल्यू. ए. सय्यद- नायगाव (सांगली), आर. आर. पत्की- बिलोली (ठाणे), एस. आर. कुलकर्णी- नांदेड (नाशिक), आर. पी. घोले- नांदेड (सहकार न्यायालय नाशिक), पी. जी. बारटक्के- देगलूर (बाभुळगाव यवतमाळ), पी. बी. तौर- लोहा (कल्याण ठाणे,
एस. जी. शिंदे- मुखेड (कोल्हापूर), आर. बी. सौरेकर- नायगाव (कोल्हापूर), सुविधा पांडे- हदगाव (नंदुरबार), जी. सी. फुलझळके- नांदेड (मानगाव, रायगड), के. एम. चंडालिया- हिमायतनगर (सांगली), एन. एल. गायकवाड- नांदेड (सहाय्यक धर्मदाय आयुक्त ठाणे), पी. यु. कुलकर्णी- नांदेड (मालेगाव वाशीम), पी. के. धोंडगे- लोहा (सहायय्क धर्मदाय आयुक्त ठाणे), एन. ए. एन. मुद्दसर- नांदेड (वाशी ठाणे), एस. आर. बडवे – नांदेड (फलटन सातारा), एच. के. वानकर- नांदेड (सहकार न्यायालय सांगली).

नांदेड येथे येणारे नवीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुढीलप्रमाणे :

ए. आर. मोहाने -दहीवडी सातारा (देगलूर), एम. आर. स्वानी- परांडा उस्मानाबाद (नांदेड), व्ही. व्ही. सावरकर- नागपूर (बिलोली), श्रीमती पी. एस. जाधव- खेड रत्नागिरी (नांदेड), के. आर. कोंडारे- तासगाव सांगली (हिमायतनगर), श्रीमती ए. एच. ठाकूर- फलटण सातारा (सहकार न्यायालय नांदेड), ए. व्ही. डाखोरे- मुंबई (लोहा), श्रीमती. आर. एन. खान- ईगतपुरी नाशिक (देगलूर), अश्र्विनी बी. पाटील -डहाणू ठाणे (नायगाव बाजार), एन. एस. बारी -मुुंबई (मुखेड), एस. बी. गावडे- कामठी नागपूर (माहूर), एस. एल. वैद्य- सिंदखेडा धुळे (लोहा), श्रीमती व्ही. व्ही. चौधरी- बल्लारपूर चंद्रपूर (सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड), एस. आर. पाटील- पुणे (हदगाव), आर. एम. लोलगे- रावेर जळगाव (नायगाव बाजार).

नांदेड जिल्ह्यातून एकूण पाच जिल्हा न्यायाधीश बदलून जाणार असून पाच येणार आहेत. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सात बदलून जाणार असून सात येणार आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी १९ जाणार आहेत आणि १५ येणार आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,790FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!