ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – शहाजी उमाप हे 30 जुलै रोजी नांदेड IG (पोलीस महानिरीक्षक) पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता असून सध्याचे आयजी शशिकांत महावरकर हे पिंपरी चिंचवड येथे सह आयुक्त पदावर रुजू होणार असल्याची शक्यता आहे.
नांदेड परिक्षेत्राच्या आयजी पदी अर्थात पोलीस महानिरीक्षकपदी शासनाने शहाजी उमाप यांची नियुक्ती केली होती. तर या पदावर सध्या कार्यरत शशिकांत महावरकर यांची पोलीस महानिरीक्षक सीआयडी पुणे या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र, शशिकांत महावरकर हे या बदली आदेशाविरुद्ध न्यायालयात (कॅट) गेले. त्यानंतर न्यायालयाने या बदलीला 19 जुलै पर्यंत स्थगिती दिली होती. यावर आज दि. 19 रोजी सुनावणी झाल्यानंतर शहाजी उमाप हे साधारणत: दि. 30 जुलै रोजी नांदेड आयजी पदाचा पदभार घेण्याची शक्यता आहे.
आज न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान शासनाने शशिकांत महावरकर यांना नवीन जागी नियुक्तीसाठी चार पर्याय न्यायालयापुढे ठेवले होते. त्यात पिंपरी चिंचवड सहआयुक्त पदाचाही समावेश असून शशिकांत महावरकर हे या पदावर बदली होऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
न्यायालयाने याप्रकरणी दि. 29 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवलेली असून त्यानंतर शहाजी उमाप हे नांदेड येथे आयजी पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻