Saturday, June 22, 2024

नांदेड जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर; अनेक दिग्गजांचे गट आरक्षित, अनेकांचे स्वप्न भंगले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत गुरुवार दिनांक 28 जुलै रोजी काढण्यात आली. जिल्हा परिषद आरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची उपस्थिती होती. या सोडतीत अनेक दिग्गजांचे गट इतर प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून त्यामुळे अनेकांची गोची झाली आहे. तर अनेक ठिकाणी मोठी तयारी केलेल्या गटात अनेकांचे स्वप्नभंग झाले आहे.

मावळत्या सभागृहाची मुदत 20 मार्च 2022 रोजी संपली होती. सध्या जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्याकडे होता. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं (ओबीसी) मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने आरक्षण सोडत लांबणीवर पडली होती. अखेर आज गुरुवारी ही सोडत काढण्यात आली.

आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेत 10 गट वाढल्याने सभागृहात आता 73 सदस्य निवडून येणार आहेत. मावळत्या सभागृहात ती संख्या 63 सदस्यांची होती. विविध प्रवर्गातून आता जवळपास ३७ महिला सदस्य असणार आहेत. या आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांचा गट आरक्षित झाला असून काही नवीन चेहऱ्यांना आता संधी मिळणार आहे. यात विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, शिवसेनेचे बबन बारसे, साहेबराव धनगे यासह आदींना या आरक्षणाचा फटका बसला आहे.

७३ पैकी ३७ जिल्हा परिषदेचे गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात अनुसुचित जातींच्या महिलांसाठी ७, अ. जमाती महिला ४, नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला ८, सर्वसाधारण महिला १८ असे गट राखीव ठेवण्यात आले आहेत.

नांदेड जिल्हा परिषदेच्या आगामी काळात होऊ घातलेल्या ७३ गटांसाठीच्या आरक्षण प्रक्रिया गुरूवार दि.२८ जुलै रोजी नियोजन भवन येथील डॉ.शंकरराव चव्हाण सभागृहात खचाखच भरलेल्या सभागृहात पार पडली. सुरूवातीला चक्रानुक्रम पध्दतीने मागील पाच निवडणूकीचे आरक्षणानुसार ही सोडत काढण्यात आली.

अनुसूचित जातीसाठी राखीव
सुरूवातीला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जिल्ह्यातील गौळ, वडेपूरी, सोनखेड, कलंबर(बु), सावरगांव (न), बहाद्दरपूरा, गोकुंदा, भोसी, दुधड, इस्लापूर, मोहपूर, बोधडी, पिंपळढव, वाई ही गटं आरक्षित झाली आहेत. त्यातून इश्‍वरी चिठ्ठीव्दारे मल्टीपर्पज हायस्कुलच्या ५ व्या वर्गात शिकणार्‍या धनश्री दत्ता हुसूकवार व प्रिया हिरामन धोंगडे या चिमुकल्यांनी महिलांसाठी वडेपूरी, गौळ, गोकुंदा, पिंपळढव, मोहपूर, भोसी, बहाद्दरपूरा हे ७ गट चिठ्ठी काढून अनुसूचीत जातीच्या महिलांसाठी आरक्षीत झाले.

अनुसूचीत जमातीसाठी ७ गट
अनुसूचीत जमातीसाठी ७ गट आरक्षीत झाले.  त्यात लखमापूर, लहान, तळेगांव, आरळी, सावरगांव(पि.), देगाव, करखेड यातील ४ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले त्यात सावरगांव(पि.), आरळी, करडखेड, लहान या गटांचा समावेश आहे.

ओबीसी/ नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १५ गट
नागरीकांचा मागसप्रवर्गसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात २०.३ टक्के आरक्षण असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. त्यात १५ गट नागरीकांच्या मागास प्रवर्गसाठी आरक्षीत केले. यात मनाठा, धनेगांव, बरबडा, आष्टी, मालेगांव, वाजेगांव, रामतीर्थ, कुंटूर, मांजरम, उमरा, माळाकोळी, शिराढोण, एकलारा, मुक्रमाबाद, जांब (बु) यांचा समावेश आहे. यातील ८ गट महिलांसाठी आरक्षीत करण्यात आले. त्यात वाजेगांव, मुक्रामाबाद, शिराढोण, धनेगांव, मनाठा, बरबडा, उमरा, एकलारा हे महिलांसाठी इश्‍वरी चिठ्ठीव्दारे आरक्षीत करण्यात आले.

ओपन/ सर्वसाधारण प्रवर्गातील ३७ गट
सर्वसाधारण प्रवर्गातील ३७ गटांपैकी १८ गटांवर महिलांसाठीचे आरक्षण काढण्यात आले. यात सिरंजणी, सरसम(बु), निवघा(बा), रूई, पाळज, करखेली, येताळा, लोहगांव, ङ्गुलवळ, कुरूळा, येवती, मरखेल, हानेगांव, कोळी, नरसी, दापका(गुं), गोरठा, पेठवडज हे १८ गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत झाले आहेत.

तर उर्वरित १९ गट  पळसा, वानोळा, सारखणी, मांडवी, जलधारा, तामसा, येळेगांव, वाडी(बु), लिंबगाव, बळीरामपूर, बारड, मुगट, माळकौठा, सगरोळी, कौठा, चांडोळा, बार्‍हाळी, खानापूर, शहापूर हे सर्वसाधारण साठी सुटले आहेत. त्यामुळे या गटातील अनेक इच्छुकांनी सुटकेचा निश्‍वा:स सोडला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!