Saturday, July 27, 2024

नांदेड जिल्हा परिषदेमध्ये हे दहा गट वाढले; सदस्य संख्या आता 73 तर पंचायत समिती सदस्यसंख्या 146 वर!

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ वाढलेल्या 10 गटांची आणि गणांची, समाविष्ट गावांच्या नावांसह यादी पुढीलप्रमाणे…

नांदेड– दशकापूर्वी लोहा तालुक्यातील वडेपुरी जिल्हा परिषद गटाची निर्मिती झाल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल दहा जिल्हा परिषद गटांची वाढ झाली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गटांची नव्याने निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या जि. प. प्रभागाची अधिसूचना काल गुरुवार, दि. 2 मे रोजी जाहीर झाली आहे. यापूर्वी 63 जि. प. सदस्यांची संख्या असलेल्या नांदेड जिल्हा परिषदेत नव्याने दहा गटाची निर्मिती झाल्यामुळे आता सदस्य संख्या 73 एवढी झाली आहे. पुनर्रचनेत किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, नायगाव, कंधार, मुखेड तालुक्यात प्रत्येकी एका गटाची वाढ झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 73 एवढी झाली असून पंचायत समिती गणाची संख्या 146 एवढी झाली आहे. नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या जि.प. गटात माहूर तालुक्यातील लखमापुर, किनवट तालुक्यात सारखणी, हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी, हदगाव तालुक्यात कोळी, अर्धापूर तालुक्यात लहान, नांदेड तालुक्यात धनेगाव, मुदखेड तालुक्यात माळकवठा, नायगाव तालुक्यातील देगाव, कंधार तालुक्यात गौळ, मुखेड तालुक्यात दापका गुं. गटाची निर्मिती झाली आहे.

◆तालुक्याचे नाव       ◆नवीन गट व गणांचे नाव
माहूर:                      लखमापूर
                               (गण: लखमापूर, हडसणी)
किनवट:                  सारखणी
                               (गण: मोहपूर, घोटी)
हिमायतनगर:          सिरंजनी
                               (गण: पवना, मंगरूळ)
हदगाव:                   कोळी
                               (गण: कोळी, पिंपरखेड)
अर्धापूर:                  लहान
                               (गण: पार्डी, महादेव पिंपळगाव)
नांदेड:                     धनेगाव
                               (गण: मरळक, धनेगाव)
नायगाव:                 देगाव
                               (गण: राहेर, घुंगराळा)
मुदखेड:                  माळकवठा
                               (गण: रोहिपिंपळगाव, डोणगाव)
कंधार:                    गौळ
                               (गण: गौळ, वहाद)
मुखेड:                    दापका गुं.
                               (गण: दापका गुंडोपंत, हाळणी)

दहा वर्षांपूर्वी लोहा तालुक्यात वडेपुरी गटाची निर्मिती झाल्यानंतर जि. प. सदस्य संख्या 63 झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी दहा जि.प. गटांची झाल्यामुळे नवनवीन इच्छुकांना संधी निर्माण झाली आहे.

वाढलेल्या गटांची तालुकानिहाय नावे आणि त्यात समाविष्ट गावांची नावे

माहूर: लखमापूर
माहूर तालुक्यात वाई बाजार व वाटोळा हे दोन जि. प. गट आहेत. पुनर्रचनेत लखमापूर गटाची भर पडली आहे. लखमापुर गटात लखमापुर, शेकापुर, लांजी, बिंबायत, मालवाडा, मुरली, टाकळी, वडसा, पडसा, उमरा, हडसणी, रुई, गुंडवळ, शेख फरीद वजरा, नमाळ, दत्तमांजरी, ईवळेश्वर, हिंगणी, दिगडी कु., तांदळा या गावांचा समावेश करून लखमापूर गटाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.

किनवट: सारखणी
किनवट तालुक्यात मांडवी, गोकुंदा, बोधडी बुद्रुक, जलधारा, ईस्लापुर हे पाच जि. प. गट आहेत. या तालुक्यात नव्याने सारखणी व महापूर या गटाची भर पडली आहे. सारखणी गटाची निर्मिती करताना सारखणी, सलाईगुडा, दहेली, धावजी नाईक तांडा, दुंड्रा, वझरा बु., निराळा, निराळा तांडा, गौरी, चिंचखेड, धानोरा सी, रामपुर, पाथरी, खंबाळा, पार्डी सी, सकुनाईक तांडा, बोथ, परसराम नाईक तांडा, दरसांवगी सी, मोहाडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

हिमायतनगर: सिरंजनी
हिमायतनगर तालुक्यात सरसम बु आणि दुधड हे दोन गट आहेत. या तालुक्यात नव्याने सिरंजनी गटाची निर्मिती करताना सिरंजनी, मंगरूळ, सिरपल्ली, डोल्हारी, पळसपुर, एकम्बा, कवठा, बोरगडी, धानोरा, वारंग टाकळी, खैरगाव, कारला, वडगाव, महादापूर, वासी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

हदगाव: कोळी
हदगाव तालुक्यातील तामसा, निवघा बा, रुई धा, पळसा, मनाठा आणि आष्टी हे गट आहेत. या तालुक्यात कोळी या नवीन गटाची निर्मिती करताना कोळी, आमगव्हाण, भाटेगाव, उमरी खुर्द, निवळा, चक्री, महाताळा, मरडगा, पिंपरखेड, बोरगाव, हस्तरा, चेंडकापूर, मारलेगाव, नेवरी, नेवरीवाडी, तालंग, उंचाडा या गावांचा समावेश आहे.

अर्धापूर: लहान
अर्धापूर तालुक्यातील येळेगाव, मालेगाव हे दोन गट आहेत. या तालुक्यात नव्याने लहान गटाची निर्मिती करताना लहान, पार्डी म, चोरंबा ना, निमगाव, खैरगाव म, सोनाळा, चाभरा तांडा, रोडगी, पांगरी, लोणी बु., लोणी खु. या गावांचा समावेश आहे.

नांदेड: धनेगाव
नांदेड तालुक्यात वाजेगाव, वाडी बु., बळीरामपूर, लिंबगाव हे जि. प. गट आहेत. तालुक्‍यात नव्याने धनेगाव निर्मिती करताना धनेगाव, फत्तेपूर, पिंपळगाव मिस्त्री, वडगाव, तुप्पा, काकांडी, राहेगाव, भायगाव, किकी, बाबुळगाव या गावाचा समावेश करण्यात आला आहे.

मुदखेड: माळकवठा
मुदखेड तालुक्यात बारड, मुगुट हे दोन गट आहेत. तालुक्यात नव्याने माळकवठा गटात माळकवठा, वासरी, शंखतीर्थ, देवापुर, चीलपिंपरी, टाकळी, खुजडा, कामळज, रोहिपिंपळगाव, चिकाळा तांडा, चिकाळा, पांगरगाव, दरेगाव, दरेगाव वाडी, पिंपळकौठा चोर, पिंपळगाव तांडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

नायगाव: देगाव
नायगाव तालुक्यात बरबडा, कुंटुर, मांजरम, नरसी हे चार गट आहेत. या तालुक्यात नव्याने देगाव जि. प. गटाची निर्मिती करताना देगाव, शेळगाव छत्री, मुस्तापूर, आवराळा, कोठाळा, ईकळीमोर,बेटक बिलोली, खैरगाव, पिंपळगाव, घुंगराळा, गोळेगाव/ नायगाव, वाडी, बेद्री, अंचोली, नरंगल, हिप्परगा जा., रानसुगाव, तलबीड, ताकबिड, टाकळगाव, वंजारवाडी, खंडगाव या गावांचा समावेश आहे.

कंधार: गौळ
कंधार तालुक्यात शिराढोण, कवठा, बहादरपुरा, फुलवळ हे गट आहेत. या तालुक्यात नव्याने गौळ गट निर्मिती करताना गौळ, भोजूची वाडी, मानसिंग वाडी, बोरी खुर्द, उंब्रज, पातळगंगा, गुट्टेवाडी, पानशेवडी, घागरदरा, हरबळ, दिग्रस बु, उमरगा खो, मरशिवणी, भेंडेवाडी, गुंटूर, घु बलवाडी, दिग्रस खुर्द, गांधीनगर, सावरगाव या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

मुखेड: दापका गुं.
मुखेड तालुक्यात जांब बुद्रुक, चांडोळा, एकलारा, येवती, सावरगाव पी., बार्हाळी, मुक्रमाबाद ते सात जि. प. गट आहेत. या तालुक्यात नव्याने दापका गु. गटांची निर्मिती करताना वडगाव, दापका गुं., निवळी, हातराळा, हिरानगर, भेंडेगाव खुर्द, भेंडेगाव बुद्रुक, हळणी, बामणी, डोरनाळी, भासवाडी, रावणकोळा, कलंबर, तग्याळ, चिंचगाव या गावांचा समावेश करून तालुक्यातील आठवा जि. प. गट तयार करण्यात आला आहे.

पंचायत समितीचे गण 146 वर !
त्याचबरोबर पंचायत समित्यांच्या 126 गणांमध्ये 20 नव्या गणांची भर पडली आहे. त्यामुळे गणांची संख्या 126 वरून आता 146 वर पोहचली आहे. तालुकानिहाय वाढलेल्या गणांची नावे पुढीलप्रमाणे-
माहूर: लखमापूर, हडसणी
किनवट: मोहपूर, घोटी
हिमायतनगर: पवना, मंगरूळ
हदगाव: कोळी, पिंपरखेड
मुदखेड: रोहिपिंपळगाव, डोणगाव
अर्धापूर: पार्डी, महादेव पिंपळगाव
नांदेड: मरळक, धनेगाव
मुखेड: दापका गुंडोपंत, हाळणी
कंधार: गौळ, वहाद
नायगाव: राहेर, घुंगराळा

निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी 73 जि. प. गटाची गावनिहाय यादी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली. या यादीवर आक्षेप असणाऱ्यांनी मुदतीत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!