ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ कंधार, मुखेड, मुदखेड, बिलोली, कुंडलवाडी, देगलूरचा समावेश
◆ पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने निर्णय
नांदेड– नांदेड जिल्ह्यातील आणखी 6 नगर परिषदांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नगर परिषदांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्यातील ज्या नगर परिषदांची मुदत संपत आहे, त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने जारी केले होते. त्यानुसार, नांदेडमधील 6 नगर परिषदांवर आता प्रशासकांची नियुक्ती झाली आहे.
प्रशासकांची नियुक्ती झालेल्या नगर परिषदांमध्ये कंधार, मुखेड, मुदखेड, बिलोली, कुंडलवाडी, देगलूर या 6 नगर परिषदांचा समावेश आहे. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांची मुदत समाप्त झालेल्या नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंधार, मुखेड, मुदखेड, बिलोली, कुंडलवाडी, देगलूर या नगर परिषदांवर खालील अधिकारी प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार आहेत-
नांदेड जिल्ह्यातील हदगाव, उमरी आणि धर्माबाद या 3 नगर परिषदांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत डिसेंबर महिन्यात संपली आहे. त्यामुळे या नगर परिषदांवर डिसेंबर महिन्यात प्रशासक नियुक्त करण्यात आलेले असून तिथे खालील अधिकारी डिसेंबरपासून प्रशासक म्हणून कार्यभार पाहत आहेत-
याशिवाय यापूर्वी डिसेंबरमध्ये अर्धापूर आणि माहूर नगर पंचायतीवरही प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. आता याठिकाणी निवडणुका होऊन लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार घेतलेला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻