ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ प्रशांत देशपांडे पदोन्नतीने हिंगोली ग्रामीणच्या ‘डीवायएसपी’पदी
◆ इतवारा डीवायएसपीपदी माधव रेड्डी
नांदेड- राज्याच्या गृह विभागाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या 143 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नांदेड जिल्ह्यातीलही पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांना देगलूर तर इतवाराचे डॉ. सिद्धेश्वर भोरे यांना पैठण उपविभागात पाठविण्यात आले आहे. नांदेड शहरला सुरज गुरव तर इतवारासाठी माधव रेड्डी येणार आहेत.
राज्याच्या गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने दिनांक 22 मे रोजी रात्री उशिरा राज्यातील पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन पोलीस उपाधीक्षक हे पद बहाल करण्यात आले आहे.
नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांना देगलूर उपविभागात तर इतवारा उपविभागाचे डॉ. सिद्धेश्वर भोरे पैठण. नांदेड शहरला सुरज गुरव, देगलूरचे सचिन सांगळे जालना, धर्माबादचे विक्रांत गायकवाड भुसावळ तर धर्माबादला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उस्मानाबाद येथून प्रशांत संपते, माहूरला दादाराव शिनगारे, बिलोली उपविभागासाठी बाळकृष्ण हनपुडे पाटील, इतवारासाठी माधव रेड्डी हे सोलापूरहून येत आहेत.
नागरी हक्क संरक्षण विभागात जितेंद्र जाधव हे चांदुर रेल्वे अमरावती येथून, नांदेड मुख्यालयात कार्यरत असलेले अनिल चोरमले यांना पदोन्नती देऊन अंबाजोगाई उपविभाग तसेच जिल्हा विशेष शाखेतील प्रशांत देशपांडे यांनाही पदोन्नती देऊन हिंगोली ग्रामीण उपविभाग बहाल करण्यात आला आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नेमून दिलेल्या ठिकाणी रुजू होऊन तसा वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करावा असेही आदेशात नमूद केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻