ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहर व जिल्ह्यातीलसर्वच तालुक्यात बुधवार दि. १० जूलै रोजी सकाळी 7:14 वाजता भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.5 इतकी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झाली.
आज सकाळी शहराच्या बहुतांश भागात भूगर्भातून आवाज आल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अनेकजण घराबाहेर पडले आणि एकमेकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विचारपूस करण्यास सुरुवात केली. या भूकंपाच्या धक्क्यात जिल्ह्यात कुठेच जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
प्रा. डॉ. अविनाश कदम यांची माहिती
वारंगा फाटा च्या पश्चिमेला रामेश्वर तांडा नावाच्या गाव शिवारामध्ये भूकंपाचे केंद्र दिसून येत आहे. स्थानिक माहिती घेतली असता सकाळी सहाच्या दरम्यान सुद्धा हलका हादरा जाणवला होता. आणि जो हादरा सव्वासात वाजता जाणवला, त्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन संस्थेने घेतली आहे ती 4.5 अशी आहे. गेल्या वेळेस 3.6* चा भूकंप ज्या परिसरात जाणवला होता, तोच त्याच परिसरात आजचाही जाणवला आहे. विद्यापीठाने नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात 16 ठिकाणी भूकंप मापन यंत्रणा उभारली आहे. विद्यापीठाच्या सर्व भूकंप मापन यंत्राद्वारे येणाऱ्या नोंदीची तपासणी करून घेत आहोत.
-प्रा. डॉ. अविनाश कदम, संचालक भुगर्भ शास्त्र, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻