Sunday, June 4, 2023

नांदेड जिल्ह्यात आणखी एक ओमायक्रॉन रुग्ण आढळला; ‘त्याच’ कुटुंबातील महिला पॉझिटीव्ह

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हिमायतनगरच्या त्याच कुटुंबातील महिला पोझिटीव्ह

हिमायतनगर शहरातील रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे सुरु

काळजी घ्या, सुरक्षित रहा व लसीकरण करून घ्या -डॉ.गायकवाड

हिमायतनगर– शहरात मागील काही दिवसांपूर्वी दोन ओमयक्रोन रुग्ण आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आज दिनांक 30 डिसेंबर रोजी आणखी एक महिला ओमायक्रोन पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या या कोरोना विषाणूच्या व्हेरियंटने नांदेड जिल्ह्यात प्रवेश केलेला असून रुग्णांची संख्या तीन झाली आहे. या कुटुंबातील रुग्णांच्या संपर्कात अजून किती जण आले आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ह्या रुग्णांच्या संपर्कात आलेले एक नातेवाईक हे डॉक्टर असून त्यांचा संपर्क थेट जनतेशी असतो. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. नांदेड जिल्हाधिकारी व हिमायतनगर येथील आरोग्य विभागाने काळजी घेऊन शहरात लसीकरण मोहीम वाढवली आहे. या रुग्ण वाढीनंतर हिमायतनगर प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या एका डॉक्टरच्या कुटुंबातील महिला असून ओमायक्रॉनची लागण झालेल्या या महिलेने बाहेर देशातच कोविड प्रतिबंधक लस घेतलेली असल्याचे सांगण्यात येते. दि.20 डिसेंबर 2021 रोजी प्रवासात त्यांना सौम्य ताप आला होता. त्यानंतर अन्य कोणतीही लक्षणं त्यांना आढळून आली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार सौम्य स्वरुपाचा असून ते सध्या नांदेड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि  कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून इतर सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आले आहेत. याशिवाय या महिलांनी ज्या विमानाने प्रवास केला त्या विमान प्रवासातील सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात  येत असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर हिमायतनगर शहरातील निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती हिमायतनगर येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड यांनी दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!