Saturday, July 27, 2024

नांदेड जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना; तक्रार केली म्हणून वृद्धाचा गळा आवळून खून

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

● स्वस्त धान्य दुकानाची दिली होती तक्रार

● उमरी तालुक्यातील मनुर येथील घटना

नांदेड/उमरी- स्वस्त धान्य दुकानाची तक्रार तहसीलदार उमरी यांच्याकडे का केली म्हणून दुकानदाराच्या नातेवाईकांनी 65 वर्षीय वृद्धाचा गळा आवळून चौकशीच्या दिवशीच खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. ही घटना मनुर (तालुका उमरी) येथे बुधवार, दिनांक ५ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध उमरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरातही खुनाची एक घटना घडली असून त्यामुळे बुधवारी एकाच दिवशी जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना घडल्या.

उमरी तालुक्यातील मनुर येथे मनुरकर यांचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानाबद्दल धान्य वेळेवर मिळत नाही आदी तक्रारी गावातील धोंडीबा शंकर पोलावार (वय ६५ ) यांच्यासह अनेकांनी उमरी तहसीलमध्ये केल्या होत्या. सतत होणाऱ्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे मंडळ अधिकारी आणि तलाठी हे दोघेजण बुधवार, दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी मनुर येथे पोहोचले. काही तक्रारदाराची विचारपूस सुरू असताना आपला जबाब देण्यासाठी धोंडीबा पोलावार हे आपल्या घरून जात असताना त्यांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या नातेवाईकांनी रस्त्यातच अडविले. त्यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केली. यातच धोंडीबा शंकर पोलावार यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनुर गावात तणावाचे वातावरण बनले होते.

या घटनेची माहिती उमरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना समजताच त्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन लगेच घटनास्थळ गाठले. तोपर्यंत उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड हेही घटनास्थळी दाखल झाले. मयत धोंडीबा पोलावार यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात शिवाजी मनुरकर, राजेश मनुरकर, गणेश मनुरकर, गोविंद मनुरकर आणि चक्रधर मनुरकर या संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक मोहन भोसले करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!