Sunday, June 16, 2024

नांदेड जिल्ह्यात मुन्नाभाई MBBS; हदगावमध्ये आढळला बोगस डॉक्टर, गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– हदगाव, हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागातील रुग्णांना आम्ही डॉक्टर आहोत अशी बतावणी करीत मुन्नाभाई बोगस डॉक्टरांची टोळी सक्रिय झाली आहे. अशाच एका डॉक्टरवर हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हदगाव व हिमायतनगर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात वाडी- तांड्यावर जाऊन वेगवेगळ्या आजारावर आम्ही उपचार करतो असे आमिष दाखवून स्वतःजवळ कुठलीच वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री किंवा प्रमाणपत्र नसताना अनेक रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार घडत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकही त्यांच्या भामटेगिरीला बळी पडतात. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे पहावयास मिळत आहे.

एकीकडेसर्दी, ताप तर दुसरीकडे कोरोनाचे संकट असल्याने ग्रामीण भागातील नागरिकही हतबल झाले आहेत. शहरी भागातील वैद्यकीय सेवा घेण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे तात्काळ आजार कमी व्हावा यासाठी ते अशा मुन्नाभाई बोगस डॉक्टरांकडून घातक ठरू शकणारे उपचार करून घेतात. वेळप्रसंगी या उपचाराचा त्यांना फटकाही बसतो. कोळी तालुका हदगाव या गावातही असाच एक बोगस डॉक्टर संजीत बारई याने त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीच डिग्री किंवा प्रमाणपत्र नसताना खासगी वैद्यकीय रुग्णालय सुरू केले होते. या रुग्णालयांमध्ये तो रुग्णांवर उपचार करताना दिसून आला.

हदगाव येथील सरकारी रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच्या व्यवसायाबद्दल व शिक्षणाबद्दल माहिती विचारली यावेळी बोगस डॉक्टर तू तू – मै मै सुरू केली. अखेर त्याला हदगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डॉ. संजय मुरमुरे यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक फोलाने करत आहेत. या बोगस डॉक्टरवर दाखल झालेला गुन्हा हदगाव हिमायतनगर परिसरातील अन्य सहकाऱ्यांना समजताच त्यांचेही धाबे दणाणले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!