ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
•पहिल्या दिवशी 52 प्रवासी पुण्याकडे रवाना
नांदेड– बहुप्रतिक्षित असलेल्या नांदेड- पुणे विमानसेवेला अखेर आज सुरुवात झाली आहे. आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता नागपूरहून स्टार एअर कंपनीचे विमान नांदेडमध्ये उतरले. आणि पुण्याकडे सकाळी साडेदहा वाजता रवाना झाले. पुण्यासह नांदेडहून आज नागपूर विमानसेवेलाही सुरुवात झाली आहे.
पहिल्याच दिवशी नांदेडकरांनी पुणे विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 80 आसन क्षमतेच्या विमानात नांदेडहून पहिल्याच दिवशी 52 प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला. नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून दिल्ली, जालंधर, अहमदाबाद, बेंगलोर, हैद्राबाद, तिरुपती, भुज अशी विमानसेवा मागील काही महिन्यापासून सुरू झाली आहे. यामुळे नांदेड शहर हे देशाच्या विविध महत्त्वाच्या शहराला विमानसेवेने जोडल्या गेले आहे. नांदेड- पुणे आणि नांदेड- नागपूर ही विमानसेवा सुरू व्हावी अशी अनेकांची मागणी होती.
अखेर स्टार एअर कंपनीने नागपूर- नांदेड- पुणे अशी विमानसेवा आज 27 जूनपासून सुरू केली आहे. ८० आसन क्षमता असलेले विमान आज नागपूरहून सकाळी पावणेदहा वाजता उतरले. त्यानंतर काही वेळातच ते पुण्याकडे रवाना झाले. या विमानाने पुण्याला 52 प्रवासी गेले. या विमानाने परत एकच्या सुमारास पुणे येथून परत नांदेड आणि नांदेडहून सव्वा एक वाजता नागपूरकडे उड्डान घेतले. यासाठी आज भाडे कपात होऊन नांदेड- पुणे 2800 रुपये भाडे आकारण्यात आले होते. नांदेड- पुणे विमान सेवेनमुळे नांदेडकर फक्त 40 मिनिटाचा पुण्यात पोहचू शकत आहेत. या विमान सेवेचा पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तसेच व्यावसायिक आणि भाविकांनाही मोठा लाभ होणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻