Monday, October 14, 2024

नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले; तीन गोळ्या झाडून लुटारूंनी निवृत्त बँक कर्मचाऱ्यास घरासमोरच लुटले, आरोपी कॅमेऱ्यात कैद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• नांदेडच्या अष्टविनायकनगरमधील घटना
• आयजी, एसपी यांनी दिली घटनास्थळाला भेट

https://youtube.com/shorts/O2LVegCrzOI?si=I5iQYPvamIICg9tx

नांदेड– काही काळाच्या खंडानंतर नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हादरले आहे. शहराच्या अष्टविनायक नगर भागात लुटारूंनी तीन गोळ्या झाडून निवृत्त बँक कर्मचाऱ्यास त्यांच्या घरासमोरच लुटले. या खळबळजनक घटनेनंतर आयजी, एसपी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, लुटण्यात आलेले रमेश जोशी यांच्या हाताला आणि पायाला तीन पैकी दोन गोळ्या लागल्या असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेजाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये घेतलेल्या व्हिडिओत हे आरोपी आणि झटापट कैद झाली आहे.

https://www.facebook.com/share/r/ETbjM7TBAPv6gv8t/?mibextid=oFDknk

शहरातील अष्टविनायकनगर भागात राहणाऱ्या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यावर भर दुपारी गोळीबार करून त्यांच्या जवळील चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली. ही घटना आज मंगळवार दिनांक ७ मे रोजी दुपारी घडली. ही खळबळजनक घटना घडल्याचे कळताच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

https://youtube.com/watch?v=O2LVegCrzOI%3Fsi%3DuVaqI1usJWkZbNsP

शहराच्या भावसार चौक परिसरातील अष्टविनायकनगर भागात राहणारे सेवानिवृत्त बँक कर्मचारी रवींद्र रामराव जोशी (वय 62) हे दुपारी भावसार चौक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेमधून आपले सेवानिवृत्ती पेन्शन काढून घराकडे चालत आले. अगदी घराचे गेट उघडून त्यांनी आत प्रवेश केला. याचवेळी त्यांचा पाठीमागून पाठलाग करून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने जोशी यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. लगेचच सावध झालेल्या श्री. जोशी यांनी झटापट करून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, चोरटा खाली पडलाही! मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर त्यांच्या हातातील ४० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. घटनास्थळाला फॉरेनसीकच्या टीमने भेट दिली आहे. दरम्यान,चोरट्यांनी तीन गोळ्या झडल्याचे सांगण्यात येत असून यातील दोन गोळ्या रमेश रवींद्र जोशी यांच्या हाताला आणि पायाला लागल्या आहेत. त्यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे रवींद्र जोशी हे घरी एकटेच राहतात.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश वाघ, विमानतळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनीही घटनास्थळाला पाहणी केली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!