ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ बदली आदेश 👇🏻
नांदेड- तीन वर्षाहून अधिक नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी उत्कृष्ट काम केलेले डॉ. सुनील लहाने यांची विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे सहआयुक्त पदावर बदली झाली आहे. नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदी पुणे महानगरपालिकेतील उपायुक्त महेशकुमार डोईफोडे हे येत आहेत. त्यांच्या बदल्यांचा आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांनी बुधवार दिनांक 31 मे रोजी जारी केले.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने हे ऐन कोरोनामध्ये अकोला येथून नांदेड येथे आले होते. कोरोना काळात त्यांनी उत्कृष्ट काम करून कोविड-19 ची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. त्यांची यापूर्वी तीन वेळा बदली झाली होती. परंतु शासनाने त्यांना मुक्त केले नव्हते. एक नोव्हेंबर 2022 पासून त्यांच्यावर महापालिकेचे प्रशासक म्हणूनही जबाबदारी होती. अखेर आज शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी प्रशासकीय कारणावरून त्यांची बदली विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे सहआयुक्त म्हणून केली आहे.
त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नांदेड- वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आता महेशकुमार डोईफोडे हे येत आहेत. डोईफोडे हे पुणे महानगरपालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻