Saturday, July 27, 2024

नांदेड लोकसभेच्या जागेसाठी एकूण ९२ अर्ज दाखल, शेवटच्या दिवशी ७२ अर्ज; ८ एप्रिल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नांदेड लोकसभेच्या जागेसाठी एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले, यात सत्ताधारी भाजप महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर इतरही विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!