ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

# कार्यकारी अभियंता पदावरून अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती
नांदेड– येथील शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर महानगरपालिका सेवेतील कार्यकारी अभियंता गिरीश कदम यांची शासनाने पदोन्नतीने नियुक्ती केली आहे.
दि.३० जून २०२१ च्या शासन निर्णयान्वये नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या आस्थापनेवर मंजुर एका पदाव्यतिरीक्त अधिकचे “अतिरीक्त आयुक्त” संवर्गातील एक पद निर्माण केलेले आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने गिरिश जांबुवंतराव कदम (कार्यकारी अभियंता, नांदेड वाघाळा महानगरपालिका) यांच्या नावाचा प्रस्ताव शासनाच्या निवड समितीसमोर सादर करण्याबाबतचा ठराव दि. ३० ऑगस्टमध्ये २०२१ संमत केलेला होता. त्यानंतर आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केलेला आहे. त्या प्रस्तावानुसार “अतिरिक्त आयुक्त”, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका या रिक्त असलेल्या पदावर निवडीने नियुक्तीसाठी गठीत केलेल्या शासन स्तरावरील निवड समितीने गिरीश कदम, कार्यकारी अभियंता, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांची शिफारस केली. निवड समितीच्या सदर शिफारशीस शासनाने मान्यता दिली आहे.
त्यानुसार गिरीश कदम यांची “अतिरिक्त आयुक्त”, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका या रिक्त पदावर निवडीने नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी काढण्यात आले आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
