Thursday, March 28, 2024

नांदेड- वाघाळा महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; ३१ प्रभागात ९२ नगरसेवक निवडले जाणार, याप्रमाणे झालेली आहे रचना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी

नांदेड- नांदेड वाघाळा शहर महापालिकेची – अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी जाहीर केली आहे. दरम्यान दि. ४ जुलै रोजी प्रारुप प्रभाग रचनेच्या ६६ पैकी ५५ जणांच्या आक्षेपांवर सुनावणी झाली. हा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर झाल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी आज मंगळवार दि. १९ जुलै रोजी अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेत सध्या ३० प्रभागातून ८१ सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आता ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वाढीव लोकसंख्येच्या आधारावर ३१ प्रभागात ९२ सदस्य निवडले जाणार आहेत.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने गुगलमॅपद्वारे महापालिकेच्या प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा दि. १३ जून रोजी प्रसिद्ध केला होता.

सध्या महापालिकेत ३० प्रभागातून ८१ सदस्य निवडून आले आहेत. मात्र ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वाढीव लोकसंख्येच्या आधारावर ३१ प्रभागात ९२ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महिनाभरापूर्वी महापालिकेच्या प्रारुप नगररचना जाहीर करून यावर हरकती व आक्षेप मागवले होते. जारी झालेल्या प्रारूप रचनेवर ५८ जणांनी ६६ आक्षेप दाखल केले होते. यातील ५५ जणांच्या आक्षेपावर पुणे येथील समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत ननवरे यांच्या अधिपत्याखाली आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने व अन्य काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेत काही दिवसांपूर्वी सुनावणी घेण्यात आली.

हा अहवाल समाजकल्याण आयुक्तांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. या अहवालाच्या निरीक्षणानंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी महानगरपालिका अधिनियमाचे कलम 5 (3) व कलम 14 अन्वये प्राप्त महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती मंगळवार दि. १९ जूलै रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविली आहे.

प्रभाग आणि प्रभागाची व्याप्ती तसेच लोकसंख्येचा आकडा पुढीलप्रमाणे:

प्रभाग क्रमांक 1 तरोडा खुर्द, लोकसंख्या 17 273 त्यात अनुसूचित जाती 40 52 तर अनुसूचित जमाती  ७६३ व्याप्ती- तरोडा खुर्द मुळगाव, गजानन नगर, आयोध्यानगर वेदांतनगर, शिवरायनगर, सिद्धांतनगर, ओंकारेश्वरनगर, सरपंचनगर, पवननगर, स्वागतनगर, सन्नाकालनी, परवानानगर, राजेशनगर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुद्रुक लोकसंख्या 19 40 2 त्यात अनुसूचित जाती 61 76 तर अनुसूचित जमात 539 प्रभागाची व्याप्ती- तरोडा बु., पालीनगर, नर्सिंग सोसायटी, अरुणोदयनगर, श्रीकृष्ण मंगल कार्यालय परिसर, सांदीपणी शाळा परिसर, बी अँड सी कॉलनी, नुमानिया नगर, आसरानगर, बाजीरावनगर, नालंदानगर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 3 बेलानगर/ माणिकनगर लोकसंख्या 18 76 7 अनुसूचित जातीची 74 30 तर अनुसूचित जमातीचा 629 व्याप्ती- बेलानगर, अंकुर नगर, शास्त्रीनगर, मंत्रीनगर, मानिक नगर, पाटबंधारे नगर, श्रीनाथ नगर, शिव विजय कॉलनी, संभाजीनगर, चैतन्य नगर परिसर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 4 सांगवी लोकसंख्या १७९९३ अनुसूचित जाती 71 34 तर जमाती ५ २८ व्याप्ती- सांगवी बु. , अंबानगर, शिवनेरी नगर, गोपाळ नगर, सिद्धार्थ नगर, पांडुरंग नगर, गोविंद नगर, ज्ञानमाता विद्या मंदिर, महाराणा प्रताप सिंह सोसायटी, म्हाळजा.

प्रभाग क्रमांक 5 नाईकनगर/ आनंद नगर लोकसंख्या 16 4 51 अनुसूचित जातीचे 28 69 जमातीचे 496 प्रभागाची व्याप्ती- नाईक नगर, नालंदा विद्यालय, इंदिरानगर, आंबेकर नगर, विद्युत नगर, आनंद नगरचा भाग, शोभा नगर, सुंदर नगर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 6 कैलास/नगर भाग्यनगर लोकसंख्या 17 ० 55 अनुसूचित जातीचे 23 19 कर्जमाफीचे 671 व्याप्ती- कैलास नगर, उदयनगर, अशोक नगर, वृंदावन सोसायटी, भाग्यनगर, हनुमान नगर, शास्त्रीनगर, एसटी वर्कशॉप परिसर, सहयोग नगर, पोलीस कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, फार्मसी कॉलेज परिसर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 7 जंगमवाडी/ प्रभातनगर लोकसंख्या 19 8 28 अनुसूचित जाती 43 90 तर अनुसूचित जमात ५ ९९ व्याप्ती- जंगमवाडी, प्रभात नगर, निजाम कॉलनी, श्रीनगर, विवेक नगर, सन्मित्र कॉलनी, विद्यानगर, पीपल्स कॉलेज परिसर, स्नेहनगर, बजाज नगर, यशवंत नगर विस्तारीत, शेतकी शाळा, काबरा नगर, ज्ञानेश्वर नगर, वामन नगर, दिपनगर, बीएमसी कॉलनी इत्यादी.

प्रभाग क्रमांक 8 गणेशनगर लोकसंख्या 18 8 32 अनुसूचित जाती 83 80 तर अनुसूचित जमात २५२ प्रभागाची व्याप्ती- नांदेड हाउसिंग सोसायटी, विजयनगर, यशवंत नगर, गणेश नगर, नागसेनर नगर, रामानंदनगर, पुष्पनगर, समता नगर, नंदनवन कॉलनी, आंबेडकर नगरचा भाग, जनता कॉलनी इत्यादी.

प्रभाग क्रमांक 9 शिवाजीनगर लोकसंख्या 17 1 92 अनुसूचित जातीस ७२21 जमाती १21 व्याप्ती- शिवाजीनगर, फुलेनगर, वाडिया फॅक्टरी, महावीर सोसायटी, पारस नगर, लालवाडी, अरविंदनगर, तेहरा नगर, श्रावस्तीनगर, जयभीम नगर, रमाबाई सोसायटी, उद्योग नगर, राधाकृष्णनगरी.

प्रभाग क्रमांक 10 नईआबादी लोकसंख्या 16९90 अनुसूचित जात 34 72 जमात ११२ व्याप्ती- लेबर कॉलनी, आयटीआय , एचायजी कॉलनी, महात्मा फुले मार्केट, नईआबादी, मगदूम नगर, जनता मार्केट, विश्रामगृह, गोकुळ नगर

प्रभाग क्रमांक 11 गोकुळनगर लोकसंख्या 16११७ अनुसूचित जाती 26 73 जमाती ६०१ व्याप्ती – गोकुळ नगर, विष्णू नगर, गोरक्षण, मस्तानपुरा, हमालपुरा, खोब्रागडे नगरचा भाग, रेल्वे यार्ड, औद्योगिक वसाहत, महादेव दाल मिल परिसर, विसावा नगर, स्टेडियम परिसर, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसर.

प्रभाग क्रमांक 12 बाबानगर लोकसंख्या 17० 86 त्यात अनुसूचित जाती 32 31 तर अनुसूचित जमाती ५ 53 प्रभागाची व्याप्ती- बाबानगर, मगनपुरा, राजेंद्र नगर, हर्ष नगर, शाहूनगर, नवा मोंढा, खोब्रागडे नगर, वसंत नगर, जवाहर नगर, श्याम नगर, किशोर नगर, शासकीय तंत्रनिकेतन परिसर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 13 हनुमान गड लोकसंख्या 14 4 19 अनुसूचित जात 28 19 अनुसूचित जमात ९३७ व्याप्ती – हनुमान गड, रायगड नगर ,भास्कर नगर, जानकी नगर, ताज नगर, श्रीराम नगर, नंदिग्राम सोसायटी चा भाग , गीता नगर, शारदानगर, नाथ नगर, मयूर विहार कॉलनी.

प्रभाग क्रमांक 14 शिवनगर
लोकसंख्या १७8 65 अनुसूचित जाती 41 57 अनुसूचित जमात ४०९ व्याप्ती- शिवनगर, गोविंद नगर, गंगानगर सोसायटी, फारुखनगरचा भाग, सखोजी नगर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 15 टाऊन मार्केट लोकसंख्या 16 4 67 अनुसूचित जातीचे 22 13 अनुसूच जमातीचे ५४० व्याप्ती- टाऊन मार्केट, दत्तनगरचा भाग, गुमास्ता सोसायटी, विनायक नगर ,जवाहर नगर, मित्र नगर ,नंदिग्राम सोसायटी इत्यादी.

प्रभाग क्रमांक 16 हैदरबाग लोकसंख्या 19 5 93 अनुसूचित जाती ५ 94 अनुसूचित जमात 38 व्याप्ती- हैदराबाद एक, दोन, कापूस संशोधन केंद्र, इमरान कॉलनी, लक्ष्मी नगर, ममता कॉलनी, इस्लामपुरा, वाल्मीक नगर, ब्रह्मपुरीचा भाग, मोहमदिया कॉलनी, मोहसीन कॉलनी इत्यादी.

प्रभाग क्रमांक 17 ईदगाह लोकसंख्या १९६००  अनुसूचित जमाती 39 व्याप्ती- ब्रह्मपुरीचा भाग, एकबालनगर, उमर कॉलनीचा भाग, बिलालनगर, हबिबीया कालनीचा भाग, टायर बोर्ड चा भाग इत्यादी.

प्रभाग क्रमांक 18 खुसरोनगर/ उमर कॉलनी लोकसंख्या 19613 अनुसूचित जातीचे चार अनुसूचित जमातीचे 65 व्याप्ती- उमर कॉलनीचा भाग, रहिमतनगरचा भाग, देवीनगर, हबीबीया कॉलनीचा भाग इत्यादी.

प्रभाग क्रमांक 19 चौफाळा लोकसंख्या 16 6 74 अनुसूचित जातीचे 12 80 अनुसूचित जमातीचे 28 व्याप्ती- राम रहीमनगर, मंडई, विनकर कॉलनी, चौफाळा, मदिनानगर, गंगा नगर, सुळ टेकडी, मरघाट परिसर, बिलाल नगरचा भाग, प्रीतीनगर इत्यादी.

प्रभाग क्रमांक 20 सिद्धनाथपुरी/ करबला लोकसंख्या 19016 अनुसूचित जातीचे १४ ०५ जमातीचे ४१२ व्याप्तीमध्ये सिद्धनाथपुरीचा भाग, मंडईचा भाग, हात जोडी, गनिपुरा, नई मजीत परिसर, सिद्धार्थ नगर, करबला रोड इत्यादी.

प्रभाग क्रमांक 21 मन्यारगल्ली/ होळी लोकसंख्या १७७५१ अनुसूचित जाती ३९३ अनुसूचित जमात २७३ व्याप्ती- मन्यारगल्ली, होळी, इतवारा भाग, धनगर टेकडी, रंगार टेकडी चा भाग, बागवान गल्ली, नगरेश्वर मंदिर भाग, संयदान मोहल्ला, कुंभार टेकडी, सराफा, मारवाड गल्ली, बुरुड गल्ली इत्यादी.

प्रभाग क्रमांक 22 इतवारा लोकसंख्या 17३ 36 अनुसूचित जातीच्या 28 44 अनुसूचित जमात 97 व्याप्ती- शांतीनगर, खोजा कॉलनी, अलीनगर, शक्तिनगर, साईनगर, देशमुख कॉलनी, ईतवारा भाग, संघर्ष नगर, रजा नगर, केळी मार्केट इत्यादी.

प्रभाग क्रमांक 23 गुरुद्वारा लोकसंख्या 17 367 अनुसूचित जाती 396 जमात ४०४ व्याप्ती- गुरुद्वारा परिसर, शहीदपुरा, चिखलवाडी, पाठक गल्ली, वेंकटेश नगर, गणराज नगर, शास्त्रीनगर, यात्री निवास, लोहार गल्ली भाग इत्यादी.

प्रभाग क्रमांक 24 लोकसंख्या 17 ७ 35 अनुसूचित जातीचे ५४४ अनुसूचित जमातीचे १९६ व्याप्ती- फत्तेबुरुज, अरब गल्लीचा भाग, आईना महेल टेकडी, गौतम नगर, किल्ला भाग, कालापूल, गाडीपुरा, धोबी गल्ली, बडी दर्गा, बाळगीर महाराज मठ, जुना मोंढा भाग, एक खांब मजित एरिया, हबीब टॉकीज परिसर.

प्रभाग क्रमांक 25 गवळीपुरा/ नगीनाघाट लोकसंख्या 16 8 19 अनुसूचित जात  9 44 अनुसूचित जमात 4०० व्याप्ती- गवळीपुरा, घामोडिया फॅक्टरी भाग, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा न्यायालय परिसर, वडार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय, चिखलवाडी भाग, कालेजी टेकडी, पुंडलिकवाडी, हनुमान टेकडी, जुना मोंढा परिसर, वजिराबाद भाग, दिलीप सिंह कॉलनी, गोवर्धन घाट, नगीना घाट.

प्रभाग क्रमांक 26 देगावचाळ लोकसंख्या 18 9 10 अनुसूचित जात 74 ०९ अनुसूचित जमाती ३४५ व्याप्ती- सोमेश कॉलनी, एनटीसी मिल एरिया, बस स्थानक, सरदेशपांडे चाळ, कला मंदिर, लहुजीनगर, गोवर्धन घाट टेकडी, बोरबन फॅक्टरी, देगाव चाळ, गोलचाळ, गंगाचाळ.

प्रभाग क्रमांक 27 खडकपुरा लोकसंख्या 16५ 55 अनुसूचित जात पंचायत 15 75, जमाती २२६ व्याप्ती- खडकपुरा, समीराबाग कॉलनी, दुलेषा रहमान नगर, पंचशील नगर, मनपा पंप हाऊस, पत्थरचाळ.

प्रभाग क्रमांक 28 कौठा लोकसंख्या 17 ० 68 अनुसूचित जाती 28 57 अनुसूचित जमातीचे 11 38 व्याप्ती- कौठा जुना, वसरणी.

प्रभाग क्रमांक 29 सिडको लोकसंख्या 19 5 23 अनुसूचित जात 41 14  सिडको भाग.

प्रभाग क्रमांक 30 लोकसंख्या 19355 अनुसूचित जात 54 23 अनुसूचित जमात 66३ व्याप्ती- हुडको, सिडकोचा भाग.

प्रभाग क्रमांक 31 वाघाळा लोकसंख्या 127 87 अनुसूचित जातीचे 43 79 व्याप्ती- वाघाळा, असदवन, राहुल नगर, असर्जन, फत्तेजंगपूर, रहिमपूर इत्यादी.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!