Tuesday, October 15, 2024

नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर; 24 जूनपर्यंत हरकती आणि सूचनांसाठी मुदत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- नांदेड -वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागाच्या भौगोलिक सीमा तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी महापालिकेने कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना आज सोमवार दिनांक 13 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असून महापालिकेच्या मुख्य कार्यालयात सोमवार 13 जून पासून ते शुक्रवार 24 जून दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे.

महानगरपालिकेच्या प्रभागाच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महानगरपालिका मुख्य कार्यालय, क्षत्रिय कार्यालय क्रमांक एक ते सहा येथे तसेच मनपा च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी कळविले आहे.

अधिसूचना क्रमांक रानि/मनपा 2022 प्रक्र 34 का 5 दिनांक 9 जून 2022 राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चा मुंबई 51 यापुढे अधिनियम म्हणून उल्लेखिलेला) चे कलम 5 (3) व कलम 14 अन्वये प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रातील प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली. ज्या आर्थी प्रारूप मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम 5 पोटकलम परंतु त्याप्रमाणे नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावयाचा होता. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे आदेश नुसार सदर अधिसूचनेची प्रारूप मसुदा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा अधिकार महापालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आले होते. आणि त्यानुसार सदर प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. अधी सूचनेचा मसुदा 24 जूननंतर आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी विचारात घेतील. नांदेड शहर महानगरपालिका तत्पूर्वी लेखी हरकती सादर करतील मुक्त तारखेनंतर राहिला हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

प्रारूप अधिसूचना

राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांनी महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 5 तरतुदीखाली नांदेड महापालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सभासदांची संख्या 92 निश्चित केलेली आहे. ज्याआर्थी महापालिका क्षेत्र या प्रभागात विभागण्यात आला त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. याआधी सुचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येणार आहे. एकूण 92  वार्ड राहणार असून त्यात एक वार्ड दोन सभासदांचा आणि   30 वार्ड तीन सभासदांचा असणार आहे. 2011 नुसार एकूण लोकसंख्या पाच लाख 50 हजार 439 असून त्यामध्ये अनुसूचित जाती एक लाख दोन हजार 677 तर अनुसूचित जमाती ची संख्या 12 हजार 738 आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!