Sunday, May 19, 2024

नांदेड शहरातील पथदिवे अखेर सुरू झाले; 10 दिवसांपासून शहर होते अंधारात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पालकमंत्र्यांनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर निघाला तोडगा

नांदेड– शहरातील पथदिवे अखेर सुरू झाले आहेत. गेल्या 10 दिवसांपासून हे पथदिवे बंद असल्याने सर्व रस्ते अंधारात होते. शहरातील बंद असलेल्या या सार्वजनिक पथदिव्यांसंदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर मनपा व महावितरणच्या बैठकीतील निर्णयानुसार आजपासून शहरातील हे पथदिवे सुरू करण्यात आले आहेत.

महापौर सौ. जयश्री पावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड महापालिकेवर महावितरणची २०१५ ते २०१८ या कालावधीतील थकबाकी आहे. या कालावधीत राज्यात भाजपचेच सरकार होते. मागील सरकारच्या काळात नांदेड महापालिकेला अनुदान देताना हात आखडता घेतला गेला. तर मागील दीड वर्षात कोरोनासारख्या महामारीने अर्थकारण ढासळल्याने मालमत्ता कराची अपेक्षित वसुली न झाल्यामुळे थकबाकीचा भरणा शक्य झाला नाही. मात्र अलीकडच्या काळात नियमितपणे वीज बिल भरणा सुरु आहे. मागील काळातील वीज बिल थकबाकीमुळे काही दिवसांपूर्वी महावितरणने शहरातील सार्वजनिक पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला होता. तसेच थकबाकीचा भरणा केल्याशिवाय सार्वजनिक पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करणार नाही, अशी भूमिका महावितरणने घेतली. मालमत्ता कराची अपेक्षित वसुली नसल्याने आर्थिक चणचण तर दुसऱ्या बाजूस पथदिव्यांची मूलभूत गरज अशा पेचात मनपा प्रशासन सापडले होते.

दरम्यान, शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांची अडचण लक्षात घेता महापालिका व महावितरणने योग्य ती पावले उचलून सार्वजनिक पथदिवे तात्काळ सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मनपा प्रशासनाला दिले. त्यानुसार महापौर सौ. जयश्री निलेश पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर मनपा आयुक्तांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून वीज बिल थकबाकीची काही रक्कम आता व काही रक्कम २५ मार्चपर्यंत भरण्याची हमी लेखी पत्राद्वारे दिली आहे. त्यानुसार महावितरणने आजपासून सार्वजनिक पथदिवे सुरु केले असल्याची माहिती महापौर सौ. जयश्री पावडे यांनी दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!