Thursday, March 28, 2024

नांदेड शहरात पावसाने जनजीवन विस्कळीत, अनेक भागात वीज गुल; आपत्कालीन कक्ष स्थापन, महापालिकेने पूरग्रस्तांसाठी 50 निवारे उभारले; महापौर, आयुक्त, सीईओंनी केली पुर परिस्थितीची पाहणी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- मागील दोन तीन दिवसापासुन मराठवाड्यासह नांदेड जिल्हयात सर्वदुर जोरदार पाऊस पडल्याने विष्णुपुरी धरणातुन गोदावरी पात्रात पाणी सोडन्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत आहे. तसेच शहरात संततधार चालु असल्याने शहरातील काही सखल भागात पाणी आल्याने आज दि. 13 जुलै 2022 रोजी  महापौर सौ. जयश्री निलेश पावडे व आयुक्त डॉ. सुनिल लहाने , मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर – घुगे यांनी खडकपुरा, गोकुळनगर, श्रावस्तीनगर, हमालपुरा भागाची पुरपरिस्थितीची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांना धीर देऊन त्यांना महापालिकेच्या निवारा केंद्रात मदत कार्य सुरु असल्याचे सांगितले. महापौरांनी महापालिका अधिका-यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सुचना महापालिकेच्यावतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. दरम्यान नांदेड शहर आणि जिल्ह्यात अनेक भागांमध्ये वीजपुरवठा बंद आहे.

पूर परिस्थिती लक्षात घेता महापालिकेच्या वतीने 50 तात्पुरता निवारा गृहापैकी गांधी राष्ट्रीय विद्यालय, गाडीपुरा, लिबर्टी फक्शन हॉल हतई, प्रतिभानिकेतन शाळा, होळी, आर. के. फक्शन, हॉल नुरी चौक डिलक्स फक्शन हॉल, देगलूर नाका, झेबा फक्शन हॉल, खडकपुरा खैरुरुउलुम हायस्कुल, खडकपुरा, महेमुद फक्शन हॉल, खडकपुरा, राजश्री शाहु विद्यालय, वसंतनगर, मनपा शाळा विष्णुनगर, जिल्हा परिषद शाळा, वसरणी व ईतर ठिकाणी तात्पुरते निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेच्यावतीने शहरातील विविध भागात तात्पुरते निवारा कक्ष उभारण्यात आले असुन त्या निवारा केंद्रात स्थालांतरित नागरिकांसाठी भोजन, राहण्याची व त्यांच्या आरोग्यसाठी वैद्यकिय सेवा उपलब्ध केल्या आहेत. सखल भागातील नागरिकांना निवारा केंद्रांपर्यत वाहतुक करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने अग्निशमन व्यवस्था, जीवरक्षक दल, तराफे ईत्यादी साहित्य सज्ज ठेवले आहेत. तसेच श्रावस्तीनगर भागात अडकलेल्या 8 ते 10 नागरिकांना जिवरक्षक दलाच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी हालविण्यात आले.

नावघाट पुल, आसना पुल, रेलवे गेट अंडरग्राऊंड (हिगोली रोड), मालटेकडी रेल्वे ब्रिज याठिकाणी बॅरिकेटींग केलेली आहे. सखल भागातील पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी, ब्रेकर, प्रोकनलेन यादी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच मनपा मध्ये 24×7 आपत्कालीन कक्ष स्थापन केला असुन त्याचा दुरध्वनी क्र. 02462-262626, 02462 234461 आहे.. काही अडचण आल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा. शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणेसाठी मनपा मार्फत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या वेळी  उपमहापौर अ. गफ्फार अ. सत्तार, जि.प. सिईओ वर्षा ठाकुर घुगे, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, उपायुक्त निलेश सुकेवार यांच्या सह त्या त्या प्रभागातील स. सदस्य, नगरसेवक प्रतिनिधी, मनपाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी घाबरू नये मात्र दक्ष राहण्याच्या महापौरांच्या सूचना

नांदेड शहर आणि परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात सकल पाणी साचले आहे तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाली होती .ही माहिती मिळतात शहरातील पूर परिस्थितीची पाहणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन करण्यात आलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही परंतु प्रत्येकानी दक्ष राहिले पाहिजे. आपापल्या घराच्या परिसरात पूर येत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ सुरक्षित स्थळ यावे अथवा महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. महानगरपालिका पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण ताकतीने सज्ज आहे अशी माहिती महापौर जयश्री निलेश पावडे यांनी दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!