Wednesday, July 24, 2024

नांदेड शहरात पुन्हा भूकंपाचे धक्के; साखर झोपेतील नागरिक घराबाहेर धावले; हिंगोली जिल्ह्यासह देशाच्या अनेक भागात धक्के

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

• इतर अनेक देशातही भूकंपाचे धक्के

नांदेड– शहर, जिल्ह्यासह शेजारील जिल्हा असलेल्या हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. भूगर्भातून आलेला खडखडाटाचा आवाज साखर झोपेत असलेल्या नागरिकांना चांगलाच जाणवला. अचानक झालेल्या या आवाजामुळे भयभीत होऊन नागरिक आपल्या घराबाहेर पडले. त्यानंतर एकमेकांना फोनवरून संवाद साधत भूकंपाची खात्री सर्वांनी करून घेतली. सकाळी ही चर्चा शहरभर पसरली. या धक्क्यांची रिश्टर स्केलवर 4.5 इतकी नोंद असल्याचे सांगण्यात येत असून केवळ एकवेळाच नव्हे तर 3 ते 4 वेळा हे धक्के बसले आहेत.

सकाळी 6 वाजून 08 मिनिटं ते 6 वाजून 19 मिनिटांच्या दरम्यान विविध भागात भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहेत. हिंगोली जिल्ह्याच्याही अनेक भागात हे धक्के जाणवले.आहेत. संपूर्ण देशाच्या अनेक भागात हे बसल्याचे धक्के बसले आहेत. इतकंच नव्हे इतरही अनेक देशातही भूकंपाचे धक्के बसल्याचे सांगण्यात येत आहे

मागील काही दिवसापासून नांदेड शहर व परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दोन महिन्यापूर्वी भूकंपाचा धक्का नांदेडकरांना चांगलाच जाणवला होता. त्यानंतर आज सकाळी सकाळी शहरातील शिवाजीनगर, श्रीनगर, वजिराबाद, देगलूर नाका, सांगवी, विमानतळ, छत्रपती चौक, तरोडा नाका, सिडको, हडको, लातूर फाटा या संपूर्ण भागासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भूकंपाचे हे धक्के जाणवले. तसेच हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, वारंगा फाटा या भागातही हे धक्के जाणवले.

नांदेड हिंगोली व जिल्ह्यातील बहुतांश गावात सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचा हा पहिला धक्का जाणवला. यामुळे अनेक घरे हादरल्या गेली जमिनीतून काहीतरी गडगडत गेले असा आवाज सर्वच ठिकाणी आला. हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र हा भूकंपाचा धक्का बसला असून आखाडा बाळापूरच्या बाजूस भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती आहे.


नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 व 06:19 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.5 व 3.6 अशी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!