Monday, June 17, 2024

नांदेड शहरात पोलिसांनी अचानक राबविले कोंबिंग ऑपरेशन; रात्रीच्या गस्तीत पिस्तुलासह तीन तलवारी जप्त, अनेकांना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उतरले रस्त्यावर

नांदेड– शहरात पोलिसांनी रात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविले. यावेळी एका पिस्तुलासह तीन तलवारी तसेच इतर धारदार शस्त्र जप्त करण्यात आले असून अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील फरार व वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तसेच विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याची मोहीम वेगाने राबविली जात आहे. अग्नीशस्त्र बाळगणारे, दरोडा, जबरी चोरी करणारे, पाहिजे, फरारी आरोपी शोध, समन्स- वॉरंट, पोटगी वॉरंट व गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरून २१ नोव्हेंबरच्या पहाटे कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये दोन पिस्तूल, तीन तलवारी यासह काही संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. अचानक केलेल्या कोबींग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पहाटे चार ते सकाळी नऊपर्यंत कोबींग ऑपरेशन राबवण्याबाबत आदेशीत केले. इतकंच नव्हे तर ते सस्वतःही यात सहभागी झाले. हे कोंबिंग ऑपरेशन नांदेड शहरातील सहा पोलीस ठाणे हद्दीत राबवण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोबींग ऑपरेशनसाठी एक उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पथके तयार करण्यात आली होती. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचचीही वेगवेगळी तिन पथके तयार करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले.

कोबींग ऑपरेशन साठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे हजर होते. या कोंबिंग ऑपरेशनसाठी एकूण पाच उप विभागीय पोलीस अधिकारी, सात पोलीस निरीक्षक, 34 सपोनि / पोउपनि, 150 पोलीस अंमलदार, 60 पंच व 30 कॅमेरामन असे मनुष्यबळ वापरण्यात आले.

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान माली गुन्ह्यातील आरोपी (दरोडा, जबरी चोरी चोरी, घरफोडी करणारे) एकुण 70 आरोपी तपासणी करून त्यांची झडती घेण्यात आली. शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे करणारे एकुण 35 आरोपींना तपासून त्यांची झडती घेण्यात आली आहे. रेकॉर्ड वरील पाहिजे- फरारी आरोपी एकुण पाच अटक करण्यात आले आहेत. तसेच नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी चेक करुन 13 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान स्था. गु. शाच्या पथकांनी तीन तलवारी, दोन गावठी पिस्टल, एक खंजर जप्त करुन चार आरोपीतांना ताब्यात घेवुन शस्त्र अधिनियमप्रमाणे तीन केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक तलवार जप्त करुन एका आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोबींग ऑपरेशन दरम्यान आठ प्रोव्हिशन रेड करुन 64 हजार 500 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे तीन केसेस करुन दीड हजार रुपयाचा दंड वसुल केला असून तीन बेवारस वाहने जप्त करण्यात आले आहेत.

यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भोकर) शफकत आमना, पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख (शहर), सिध्देश्वर भोरे (इतवारा), सचिन सांगळे (देगलूर), विक्रांत गायकवाड (धर्माबाद), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, भाग्यनगरचे सुधाकर आडे, वजिराबादचे जगदीश भंडरवार, इतवाराचे भगवान धबडगे, विमानतळचे अनिरुद्ध काकडे, नांदेड ग्रामीणचे अशोक घोरबांड, शिवाजीनगरचे डॉ. नितीन काशीकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, फौजदार, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!