Thursday, September 19, 2024

नागरिकांनो सावधान! भारतात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पिंपरी-चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला

राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण पोहोचली ८ वर

पुणे- महाराष्ट्रातील नागरिकांनी पुन्हा सावध होण्याची वेळ आली असून चिंता वाढणारी बातमी समोर आली आहे. कारण, भारतात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले असून आज राज्यात सात नवीन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे.

आज आढळलेल्या सात रुग्णांमध्ये पिंपरी- चिंचवडमध्ये सहा, पुण्यात एक रूग्ण आढळला आहे. त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुला आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. तसेच, पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला देखील या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालाने उघड आहे.

या सहा जणांपैकी तीन जण नायजेरियाहून आले आहेत, तर इतर तिघे त्यांचे निकटसहावासित आहेत. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड येथे आली. त्या तिघींनी ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.

या तिघींच्या १३ संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील या महिलेचा ४५ वर्षांचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्ष आणि सात वर्षांच्या दोन मुली या कोरोनाबाधित आल्या आहेत. या तिन्ही मध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर पाच जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रूग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रूग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रूग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून, हा रूग्ण १८ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविडबाधित आढळला. त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!