Tuesday, May 21, 2024

निवडणुकीची तयारी: नांदेड- वाघाळा महापालिकेच्या वार्ड आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत तर नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या आरक्षणाची सोडत 28 जुलैला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाची सोडत 28 जुलैला

नांदेड- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील नऊ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. हे आरक्षण सोडत पाच ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेसह औरंगाबाद, परभणी, लातूर, चंद्रपूर, मालेगाव, भिवंडी- निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर या नगरपालिकांचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर सहा ऑगस्ट रोजी प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल.

त्यावर सहा ते 12 ऑगस्ट या कालावधीत हरकती व सूचना देखील करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभाग निहाय अंतिम आरक्षण 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले जाईल. असे निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

28 रोजी दहा नगरपरिषदेच्या आरक्षणाची सोडत

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील एकूण दहा नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व  सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम 2022 जाहीर केला आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या आरक्षणाच्या सोडतीचा सुधारित कार्यक्रम गुरुवार 28 जुलै 2022 रोजी नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.

गुरुवार 28 जुलै रोजी देगलूर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय देगलूर येथे,  मुखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुखेड येथे, बिलोली नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय बिलोली येथे, कुंडलवाडी नगरपरिषदेची सोडत सकाळी 11 वा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन लसिका नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कुंडलवाडी येथे, धर्माबाद नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय धर्माबाद येथे, उमरी नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय उमरी येथे, भोकर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय भोकर येथे, मुदखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली  तहसिल कार्यालय मुदखेड येथे, हदगाव नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालय हदगाव येथे, कंधार नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कंधार येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाची सोडत 28 जुलैला
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सुधारित कार्यक्रमानुसार 28 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर या तालुका मुख्यालयी दि. 28 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता व माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगाव, लोहा व मुखेड येथे 28 जुलै रोजी दुपारी चार वाजता संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांचेकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणात पंचायत समिती सदस्य पदासाठीचे आरक्षणाची सोडत करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!