ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज शनिवार दि. २२ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यानिमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात यावेळी मावळते पोलीस अधिक्षक शेवाळे यांना जिल्हा पोलीस दलातर्फे सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून निरोप देण्यात आला. मागील दोन वर्षापासुन कामकाज करताना मला जनतेने, विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी, प्रसार माध्यमांनी व अधिकारी, अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे सांगत प्रमोदकुमार शेवाळे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमास अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ. अश्विनी जगताप, अर्चना पाटील, चंद्रसेन देशमुख, विक्रांत गायकवाड, सचिन सांगळे, डॉ. सिध्देश्वर भोरे, मारोती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, नांदेड ग्रामीणचे आशोक घोरबांड, इतवाराचे भगवान धबडगे, शिवाजीनगरचे डॉ. नितीन काशीकर, भाग्यनगरचे सुधाकर आडे, विमानतळचे अनिरूध्द काकडे, राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत जाधव, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, सर्व पोलीस प्रभारी अधिकारी, इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच कार्यालयीन कर्मचारी व प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुतन पोलीस अधीक्षक यांनी सर्व अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व जनतेस दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अश्विनी जगताप यांनी केली तर सूत्रसंचालन सपोनि विठठल कत्ते यांनी केले. आभार प्रर्दशन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻