Saturday, July 27, 2024

न्यू इयर पार्टीत मित्राला गच्चीवरुन खाली फेकून खून

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ नांदेड शहराच्या मालेगाव रोडवरील मध्यरात्रीची घटना

नांदेड– नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मित्रांमध्ये सुरू असलेल्या न्यू इयर पार्टीत काही मित्रांनीच एका मित्राला गच्चीवरुन खाली फेकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आहे. नवीन वर्षाच्या आरंभी नांदेड शहराच्या मालेगाव रोडवर ही घटना घडली आहे.

शहराच्या मालेगाव रस्त्यावरील भागात गजाजन महाराज मंदिराजवळील एका इमारतीच्या गच्चीवर काही मित्रांनी न्यू इअर पार्टी ठेवली होती. मद्यपानासहित ही पार्टी सुरू असतानाच मित्रांमध्येच वाद सुरू झाले. हे वाद इतके टोकाला गेले की काही मित्रांनी एका मित्राला चक्क गच्चीवरुन खाली फेकले. यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत झालेल्या युवकाचे नाव संतोष हळदेकर असे आहे.

ही माहिती सकाळी भाग्यनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर आडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळ गाठले. दारूच्या नशेत नवीन वर्ष साजरे करताना खून करणाऱ्या मारेकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!