Sunday, October 6, 2024

पतीसोबत मंदिरासमोर उभ्या असलेल्या भोकरच्या शिक्षिकेला दोन दुचाकीस्वारांनी लुटले; अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भोकरच्या शिक्षिका असलेल्या लक्ष्मीबाई देवकर ह्या आपल्या पतीसोबत भोकर फाटा येथील साईबाबा मंदिरासमोर थांबल्या असता अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील ५३ हजार रुपये ऐवज असलेली पर्स  जबरीने चोरून नेली. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली.

भोकर शहरातील गांधी चौक येथे राहणाऱ्या शिक्षिका लक्ष्‍मीबाई विश्‍वनाथ देवकर (वय 40) ह्या आपल्या पतीसह भोकर फाटा येथील साईबाबा मंदिरासमोर आपल्या दुचाकीवरून भोकरकडे जात होत्या. यावेळी त्यांच्या दुचाकीजवळ अनोळखी दुचाकीस्वारांनी येऊन लक्ष्मीबाई देवकर यांच्या हातात असलेली पर्स ज्यामध्ये सोन्याचे शॉर्ट गंठण, नगदी रुपये व एम आय कंपनीचा मोबाइल असा 52 हजार 937 रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून घेऊन पळ काढला.

याप्रकरणी लक्ष्मीबाई देवकर यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन दुचाकीस्वाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!