Sunday, December 22, 2024

पती- पत्नीचा वाद मिटविण्यासाठी पुढे आलेल्या युवकाचा खून; तर कुंडलवाडीत युवकाचा खून करून प्रेत शेतात फेकले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीची धूमधाम सुरू असतानाच इस्लापूर आणि कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. यात एकाला मित्रांनी संपविले तर दुसऱ्या घटनेत पती- पत्नीचा वाद सोडविण्यासाठी आलेल्या एका युवकाला नाहक आपला जीव गमवावा लागला. दोन्ही घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

किनवट तालुक्यातील जलधारा येथे पती- पत्नीचा वाद सुरू असल्याने शेजारी राहणारा नातेवाईक या पती- पत्नीचा वाद मिटविण्यासाठी पुढे आला. मात्र रागाच्या भरात आरोपी बाबाराव रामा झिंगरे याने भांडण सोडविण्यासाठी आलेल्या भेगाजी भाऊराव बर्डे (वय 22) याच्या गुप्तांगावर लाथा मारून त्याचा खून केला. ही घटना 26 ऑक्टोबरच्या रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. रमेश भाऊराव बर्डे यांच्या फिर्यादीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात बाबाराव झिंगरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे करत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांनी भेट देऊन तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या. या घटनेतील मयत आणि आरोपी हे नात्याने चुलत मेव्हणे असल्याचे सांगण्यात आले.

दुसऱ्या घटनेत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या चिरली गावात दि.२६ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घातक शस्त्राने वार करून मनमत इरवंत धोंडापुरे (वय 28) याचा खून करण्यात आला. मन्मथ धोंडापूरे यास गावातील पाच मारेकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी जिवंत मारण्याची धमकी दिली होती, असे मयताचे पिता ईरवंत धोंडीबा धोंडापूरे (वय ६०) रा. चिरली यांनी आपल्या तक्रारीत नोंदविले आहे. एवढेच नाही तर मारेकर्‍यांनी मनमत धोंडापुरे याचा खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चिरली शिवारातील बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतात फेकून दिला होता.

घटनेचे वृत कळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक  विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सपोनी. विश्वजित कासले, पोलिस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी, पो हे का शेषराव कदम, पोकॉ.ईद्रीस बेग, कमलाकर, चव्हाण आदीनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी बालाजी ढगे, बंटी ढगे, कृष्णा ढगे, गोविंद ढगे, सचिन खंडगावे सर्व रा. चिरली याच्या विरूद्ध कुंडलवाडी ठाण्यात विविध कलमान्वये ३०२,२०१,१४३, १४७,१४८,१४९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास  धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले करत आहेत. पाच ही आरोपी फरार झाले असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस पथके विविध ठिकाणी रवाना झाले असल्याची माहिती सपोनी.विश्वजित कासले यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!