Friday, April 19, 2024

दुचाकीवरील नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक; 21 मोबाईल व दुचाकीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, वजिराबाद गुन्हे शोध पथकाची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहराच्या विविध भागात एकट्या जाणाऱ्या नागरिक- महिलांचे मोबाईल त्याचबरोबर गळ्यातील चैन पळविणे दुचाकी पळविणाऱ्या टोळीला वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 21 मोबाईल, दुचाकी असा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

दिनांक 27 आक्टोबर रोजी चंद्रमुनी गंगाराम इंगोले यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, दिनांक 24 ऑक्टोबर रोजी ते हिंगोली गेट येथे फटाके आणण्यासाठी गेले असतांना दोन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी करीत असतांना चोरट्यास पकडले. मात्र त्यांनी ओढत नेल्याने त्यांच्या कंबरेला व दोन्ही पायाला मुक्का मार लागला होता. पेट्रोल पंपाच्या बाजुस असलेले लोक आल्याने सदर चोरट्यांनी माझा मोबाईल फेकुन तेथुन पळुन गेले आहेत. अशा तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास पोउपनि आगलावे यांच्याकडे देण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक शहर  चंद्रसेन देशमुख यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सुचना दिल्या. सदर सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, हवालदार दत्तराम जाधव, अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, व्यंकट गांगलुवार, शेख ईम्रान यांना आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशीत केले.

सदर आदेशाप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीस विचारपूस करुन आरोपीतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी शैलेश मिलींद नरवाडे (वय 21) व्यवसाय खासगी वाहन चालक राहणार अंबानगर सांगवी, नांदेड, राजरत्न मारोती कदम (वय 26) व्यवसाय मिस्त्रीकाम राहणार अंबानगर सांगवी, नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. हिंगोली गेट ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते बसस्टैंड व चंदासिंघ कॉर्नर याठीकाणी धावत्या दुचाकीवरून अनेक लोकांचे मोबाईल हिसकावून घेतल्याचे सांगितले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घरझडतीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 21 मोबाईल व अन्य साहित्य असा दोन लाख 34 हजार रुपयाचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस. कंपनीची व्हीक्टर दुचाकी ६० हजार असे एकुण दोन लाख 94 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वर नमुद गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबाबत वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!