Sunday, June 4, 2023

पनवेलहून नांदेडकडे येणाऱ्या रेल्वेत लूट; रेल्वेची स्पीड कमी होताच प्रवाशांचे दागिने लुटले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ कुर्डुवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड– कुर्डुवाडी पनवेल- नांदेड (गाडी नंबर १७६१३) रेल्वेची गती कमी झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या बोगीच्या खिडकीतुन हात घालून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिना व इतर साहित्य असे एकूण २ लाख ८३ हजारांचा ऐवज लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ही घटना गुरुवार दि. १० रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील ढवळस येथील रेल्वे स्थानकाच्या आऊटर सिग्नल जवळ लुटीची ही घटना घडली. याप्रकरणी शिल्पा कमल मोदी (रा. देवी वार्ड, काळा मारुती मंदिर ता. पुसद जिल्हा यवतमाळ) व अक्षय अनंत मोरे (रा. १३८ प्रथम बंगलो सोसायटी पोलीस लाईन पाठीमागे वाकड, पुणे) यांनी कुर्डुवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिल्पा मोदी या पनवेल -नांदेड गाडी नं. १७६१३ या गाडीने बोगी नं. एस २ बर्थ नं ४१ या डब्यातून लोणावळा ते नांदेड असा प्रवास करीत होत्या. त्या खिडकीकडे डोके करुन झोपून प्रवास करत असताना गळ्यातील सोन्याचे चेनमधील पॆंडलसह अंदाजे रक्कम २ लाख पन्नास हजारांची सोन्याची चेन ओढून पळवून नेली. याच गाडीतील अक्षय मोरे हे चिंचवड ते पूर्णा असा प्रवास करीत होते. बोगी नं एस १० बर्थ नं ७ वरुन प्रवास करत असताना डेल कंपनीच्या काळ्या रंगाच्या बॅगेतून इअरबॅंड ९०० रु, वायफाय डिव्हाइस २००० रु, अॅपल इअर बँड १२ हजार ५०० आणि इतर साहित्य असे  एकूण ३३ हजार ९०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दोघांचा मिळून एकूण २ लाख ८३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!