Tuesday, November 5, 2024

पालकमंत्री अशोक चव्हाण यांची महापालिकेला भेट; नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या विकासकामांच्या सूचना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

निधीची कमतरता पडू देणार नाही, शहराचा व आपल्या प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करा -अशोकराव चव्हाण

नांदेड– जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला भेट दिली. यावेळी नूतन उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता आणि महापौर यांच्या कार्यालयाला भेटी दिल्या. 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नांदेड शहरातील सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या तातडीने सोडविण्यास प्रशासनास सहकार्य करावे, तसेच विकास कामावर विशेष लक्ष देऊन शहराचा व आपल्या प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री निलेश पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थाई समितीचे सभापती किशोर स्वामी, सभागृहनेता अडवोकेट नीलेश कनकदंडे, नगरसेवक अब्दुल सत्तार, मसुद खान, महिला बालकल्याण सभापती संगीता डक पाटील, उपसभापती गीतांजली हटकर, महापौर आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, उपायुक्त अजितपालसिंग संधू, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, गिरीश कदम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, पक्षाचे नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिकेच्या वतीने महापौर जयश्री पावडे यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, विकास कामाचे नियोजन करा आणि तसा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा असा सल्ला यावेळी अशोक चव्हाण यांनी महापौर आणि आयुक्त यांना दिला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!