Sunday, October 6, 2024

पिस्तूल कानशिलाला लावून व्यापाऱ्याचे बारा लाख रुपये लूटले; मारहाण करीत कारची तोडफोड, नायगाव येथे सिनेस्टाइल लूट

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- वादाचा बनाव करीत नांदेडच्या एका व्यापाऱ्याचे कारमधील बारा लाख रुपये लुटण्यात आल्याची घटना नायगाव तहसीलजवळ घडली आहे. कार चालकाच्या कानशिलाला पिस्तुल लावून ही लूट करण्यात आली.

खाद्य तेलाची वसुली करुन नांदेडला निघालेल्या व्यापाऱ्याची कार नायगाव येथे तहसील कार्यालयाजवळ मंगळवार दि. ३० मे रोजी रात्री अडवण्यात आली. दोन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी अगोदर वाद घातला, आणि नंतर गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर चालकाच्या डोक्याला बंदूक लावून कारमध्ये असलेली १२ लाख रुपयांची रोकड लुटली. या धाडसी दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच नायगाव, कुंटूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. पण उपयोग झाला नाही. नांदेड येथील खाद्य तेलाचे व्यापारी रत्नाकर पारसेवार यांचे मुनीम युवराज निवळे व चालक अंकुश खुजडे हे (एमएच २६ बी एक्स ३८४९) या क्रमाकांची कार घेवून नायगाव, नरसी व मुखेड येथे वसूलीसाठी गेले होते. ११ ते १२ लाख रुपयांची ची वसूली करुन रात्री ते नांदेडकडे निघाले होते. याच दरम्यान नायगाव तहसील कार्यालयाजवळ पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी कार अडवून तु आम्हाला कट का मारली असे म्हणून चालकाशी वाद सुरू केला. त्यानंतर गाडीच्या काचा फोडल्या व चालकाच्या डोक्याला बंदूक लावली व मुनीम युवराज निवळे यांच्या हातातून रोख ११ लाख ८० रुपये असलेली बँग हिसकावून घेवून तिथून पळून गेले.

चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने दरोडा घालून दरोडेखोर काही क्षणात फरार झाले. दर मंगळवारी पारसेवार यांचे मुनीम या मार्गावर वसुलीसाठी येतात. याचा पता ठेवून दरोडेखोरांनी नायगाव मार्गे पाठलाग केला असण्याची शक्यता आहे. रक्कम लुटल्यानंतर हे लुटारू परत नायगाव शहराकडेच गेले. चालक अंकुश खुजडे व मुनीम निवळे घाबरलेल्या अवस्थेत असतांनाच नायगाव व कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेची माहिती समजताच देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचीही टिम घटनास्थळी गेली. सदरील दरोड्याचा संयुक्त तपास करण्याच्या कामाला पोलीस यंत्रणा लागली असून. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!