ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– पेट्रोलचा भडका उडाल्याने एकाच घरातील आई, वडील व मुलगा यांचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना पाच ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. उपचारादरम्यान या तिघांचाही नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात राहणारे सूर्यकांत माधवराव सक्रप्पा ( वय ५२) हे बीडी पिण्याच्या सवयीचे होते. पाच ऑगस्ट रोजी त्यांनी बीडी पीत असताना पेट्रोलच्या कॅनमध्ये पेटती बिडी पडल्याने पेट्रोलचा मोठा भडका उडाला. या प्रचंड मोठ्या भडक्यात बाजूलाच बसलेली त्यांची पत्नी गंगुबाई सूर्यकांत सक्रपा (वय 50) आणि मुलगा कपिल सूर्यकांत सक्रपा( वय 20) यांच्यासह स्वतः सूर्यकांत माधवराव सक्रपा (वय 52) असे तिघेजण पेटले.
गंभीर भाजल्याने या तिघांना देगलूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष्णुपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेने देगलूर तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे. स्वाती सूर्यकांत सक्रपा (वय 24) यांच्या माहितीवरून देगलूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सूर्यवंशी करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
