Sunday, May 19, 2024

पॉपकॉर्नच्या किंमतीत मोफत चित्रपट दाखविणार; भाजपचे मिशन “द कश्मीर फाईल्स”

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड: “द कश्मीर फाईल्स” हा चित्रपट सध्या देशभर चर्चेत असून या चित्रपटवरून मोठा वादही निर्माण होत आहे. काश्मिरमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर आधारित “द कश्मीर फाईल्स” हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावा यासाठी भाजपच्यावतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भाजपच्या पुढाकाराने पॉपकॉर्नच्या किंमतीत हा चित्रपट पाहण्याची सोया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या संपूर्ण देशात चर्चेत असलेला कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रत्येक तरुणाने पाहणे आवश्यक आहे. नांदेड शहरातील *1100 तरुणांना कश्मीर फाईल्स हा सिनेमा मोफत दाखवण्याचा निर्धार भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेड यांनी केला आहे. या प्रोजेक्टला “मिशन कश्मीर फाईल्स” असे नाव देण्यात आले आहे.

तिकिटे मिळावी यासाठी एका दिवसात तब्बल 1237 फोन आले असल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळचा पहिला शो धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोफत दाखविण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा चा शो बारावी पास झालेल्या मुलींसाठी मोफत दाखविण्यात येणार आहे. इतर शो लोकसहभागातून मोफत दाखविण्यात येणार आहेत. (तिकिटे मोफत दिली तर अनेक जण तिकिटे घेऊन जातील आणि फुकट मिळाल्यामुळे एखाद्या वेळेस पाहायला येणार नाहीत. त्यामुळे तिकिटे वाया जातील. तसेच एखादी गोष्ट फुकट मिळाली की त्याची किंमत राहत नाही.) त्यामुळे पूर्ण विचार करून खालील योजना आखली असल्याचे भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एका तिकिटाची किंमत ₹ 140 आहे. तसेच ₹70 चे पाॅपकॉर्न इंटरवल मध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण ₹ 210 किंमत असलेले तिकीट ₹50 दिल्यानंतर तरुणांना मिळतील. तरुणांनी जरी ₹50 ला तिकीट घेतले तरी त्यांना पाॅपकॉर्न मिळणार असल्यामुळे कश्मीर फाईल्स हा चित्रपट मोफतच पाहायला मिळत आहे. सिनेमा व पाॅपकॉर्न च्या एकत्रित किंमतीच्या 210 रुपयांपैकी 10 रुपयांची सवलत PVR सिनेमा च्या मॅनेजमेंटने
दिली आहे. उर्वरित रुपये 150 लोकसहभागातून जमा करण्यात येतील. कमीत कमी ₹1500 जमा करून 10 तिकीटे स्पॉन्सर करणाऱ्यांची नावे दररोज सोशल मीडियातून प्रसिद्ध करून किमान 1,00,000 लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येईल. देणगी जमा करण्यासाठी फोन नंबर 94218 39333 वर गुगल पे अथवा फोन पे करावी. स्पॉन्सर करणाऱ्यांची नावे शो च्या दिवशी पीव्हीआर सिनेमा च्या समोर होर्डिंग द्वारे जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच उद्घाटनाच्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्यांना वाटते की इतिहासात झालेल्या चुका भविष्यात होऊ नये यासाठी सर्वांना जागृत करणे आवश्यक आहे.त्यासाठी ज्यांची ऐपत आहे अशा जास्तीत जास्त दानशूर राष्ट्रप्रेमी  नागरिकांनी तिकिटे स्पॉन्सर करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

एकूण 1100 तिकिटांपैकी आत्तापर्यंत 725 तिकिटे स्पॉन्सर झाली असून 375 तिकीटेच शिल्लक राहिल्याचे सांगण्यात आले आहे.

PVR सिनेमा च्या मॅनेजमेंट सोबत चर्चा करून बुधवार दि.23 मार्च 2022 रोजीचे सर्व 8 शो ॲडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे. शो चे टाइमिंग पुढील प्रमाणे असल्याचे कळविण्यात आले आहे.

सकाळी 9 वाजता
(संपर्क : भाऊ ट्रॅव्हल्स, पाटणी कॉम्प्लेक्स, डॉ. लेन, कलामंदिर समोर नांदेड)
91581 64578)

दुपारी 11:45 ( संपर्क : भाजपा महानगर कार्यालय विष्णू कॉम्प्लेक्स, व्हीआयपी रोड, नांदेड)
99757 33164

दुपारी 12:30 ( फक्त अविवाहित मुलींसाठी राखीव)
(संपर्क :भाऊ ट्रॅव्हल्स, पाटणी कॉम्प्लेक्स, डॉ. लेन, कलामंदिर समोर नांदेड
91581 64578)

दुपारी 4 (संपर्क : भाजपा महानगर कार्यालय विष्णू कॉम्प्लेक्स, व्हीआयपी रोड, नांदेड*
99757 33164

सायंकाळी 6:30 (संपर्क: बिरजू ॲडस्, ॲक्सिस बँकेच्या खाली कलामंदिर, नांदेड)
92709 15458

रात्री 7:30,
(बनी प्लेरूम ‘, राज मॉल, G-०६  आनंद नगर चौक, नांदेड ७०२०८४१२०७ )

रात्री 10( संपर्क :भाऊ ट्रॅव्हल्स, पाटणी कॉम्प्लेक्स, डॉ. लेन, कलामंदिर समोर नांदेड
91581 64578)
रात्री 11( संपर्क :भाऊ ट्रॅव्हल्स, पाटणी कॉम्प्लेक्स, डॉ. लेन, कलामंदिर समोर नांदेड
91581 64578).

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!