ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नांदेडमध्ये येत आहेत. त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन होऊन लगेचच प्रस्थान होईल. त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सभा होणार असून ही सभा आणि इतर कार्यक्रम आटोपून नरेंद्र मोदी पुन्हा नांदेडमध्ये येऊन नांदेडहून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी उद्या शनिवार दि. 5 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत. सकाळी 11 वा. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नांदेड येथील गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर त्यांचे सकाळी 10 वा. आगमन होणार आहे. या ठिकाणावरून ते हेलिकॉप्टरने पोहरादेवीला पोहचतील.
प्रधानमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे
सकाळी 8.05 वा. ते दिल्ली विमानतळावरून नांदेडसाठी निघतील. नांदेड येथे गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर त्यांचे सकाळी 9.55 वा. आगमन होईल. सकाळी 10 वा. विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवीकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 ला वाशिम जिल्ह्यातील पोहारादेवी हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी 11.15 वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी 11.30 वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये ते जनतेला संबोधित करतील. दुपारी 12.55 वा. पोहरादेवी येथून प्रस्थान करून 1.45 वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 1.50 ला नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करतील.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
