Sunday, October 6, 2024

फायनान्स’वाल्याकडे आढळला शस्त्रसाठा, 10 तलवारी, खंजर, गुप्ती जप्त; माहूरमध्ये पिस्तुल जप्त

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ नांदेडच्या शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई

नांदेड– शहरातील एका ‘फायनान्स’वाल्याकडे शस्त्रसाठा आढळून आला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून 10 तलवारी, खंजर, गुप्ती जप्त केले आहेत. नांदेडच्या शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. दरम्यान माहूर तालुक्यात एक पिस्तुल जप्त करण्यात आले असून सिंदखेड पोलिसांनी एका चारचाकी वाहनासह दोन जणांना अटक केली आहे.

सध्या जिल्ह्यात अवैध हत्यार वापरून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारासंबंधाने पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, अप्पर पोलीस उपाअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी वेळोवळी बैठका घेवून अवैध हत्यार बाळगणारे विक्री करणारे गुन्हेगारांविरुध्द मोहिम राबविण्याचे आदेशित केले होते.

त्याप्रमाणे पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदारांना यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे आज रविवारी दिनांक 8 मे रोजी पोउपनि विश्वदीप रोडे व पोउपनि मिलींद सोनकांबळे यांना गोपनिय माहीतदाराकडुन माहीती मिळाली की, दशमेश फायनान्स दत्तनगर, नांदेड येथील मालक सुनिलसिंग भगतसिंग आडे याचे ऑफीसमध्ये बेकायदेशिर शस्त्रसाठा बाळगुन आहेत. ही खात्रीलायक माहीती मिळाल्याने वरिष्ठांना माहीती देवून गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि रवि वाहुळे, पोउपनि विश्वदीप रोडे व पोउपनि मिलींद सोनकांबळे पोहेकॉ शेख इब्राहीम, पोकॉ देवसिंग सिंगल, दिलीप राठोड, रामकिशन मोरे, काकासाहेब जगताप यांनी दशमेश फायनान्स दत्तनगर येथे जावुन छापा मारला. तेव्हा सदर ठिकाणी सुनिलसिंग भगतसिंग आडे (वय २३) राहणार चिखलवाडी कॉर्नर, नांदेड हा मिळुन आला. त्याच्या ऑफीसची पंचासमक्ष झडती घेतली असता बेकायदेशीर बाळगलेल्या आठ तलवारी, एक खंजर, एक गुप्ती असे एकुण १० शस्त्र (किमत अंदाजे ३५ हजार रुपये) मिळुन आले. हा सर्व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का करण्यात आला होता, याचा पोलीस तपास करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख व पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि रवि वाहुळे, पोउपनि मिलींद सोनकांबळे, पोउपनि विश्वदीप रोडे, पोहेकॉ शेख ईब्राहीम, पोकॉ देवसिंग सिंगल, दिलीप राठोड, रामकिशन मोरे, काकासाहेब जगताप, दशरथ पाटील, दत्ता वडजे यांनी पार पाडली.

दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात पोलिसांनी एक गावठी पिस्तुल जप्त केले आहे. काल दि. 7 मे रोजी रात्री पोलीस गस्त घालत असतांना तपासणी दरम्यान एका चारचाकी गाडीत पिस्तुल आढळून आले आहे. पोलीस पथकाने अंजनखेड पुलाजवळ एमएच 20 सीएस 370 या क्रमांकाच्या चारचाकी गाडीला थांबवले आणि तपासणी केली. तेव्हा त्यात एक गावठी पिस्तूल सापडले. या गाडीतील शेख मोहसीन शेख सुलेमान (23) रा.दत्तनगर, माहूर याच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनही जप्त करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!