Saturday, June 22, 2024

फिल्मीस्टाईल लूट: पिकअप वाहन अडवून तोंडावर स्प्रे मारून हळद व्यापाऱ्याचे ४ लाख रूपये लुटले, नांदेडजवळ महामार्गावर घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अर्धापूर– हळद पावडरची विक्री करून परत जाणाऱ्या व्यापाऱ्याचे वाहन अडवून चालकाकडील रोख ४ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. मालेगाव शिवारात फिल्मी स्टाईलने करण्यात आलेल्या या लुटीप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी तालुक्यातील वालूर येथील तिरुमला फुड कंपनीचे वाहनचालक गौतम वाठोरे हे धर्माबाद येथे हळद विक्री करून दि.९ गुरुवारी रोजी सायंकाळी ६ वा.परत परभणीकडे निघाले होते. याचदरम्यान मालेगावजवळ गाडी अडवून लुटारूंनी चालकाकडील पैसे लुटले आणि ते पसार झाले.

याबाबत पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, वसमत महामार्गावरील मालेगाव शिवारात धामदरी पाटीजवळ वाठोरे यांच्या बोलेरो (क्र.एम.एच.२२ एन ०७३९) पिकअप वाहनाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. काही संभाषण होण्यापूर्वीच तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून वाठोरे यांना बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांच्याकडील ४ लाख रुपये व अन्य साहित्य असा एकूण ४ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. घटना घडल्यानंतर दोन तासाने चालक शुद्धीवर आल्यानंतर त्याला हा प्रकार लक्षात आला. पसार होण्यापूर्वी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वाठोरे यांच्या मोबाईलचे नुकसान केल्याने वाटसरूच्या मोबाईलवरून झालेली घटना कंपनीच्या संचालकांना त्यांनी कळविली.

या घटनेप्रकरणी वाहन चालकाच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे करीत आहेत. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!