ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ रेल्वेस्टेशन ते जनसंपर्क कार्यालयापर्यंत उद्या रॅली
नांदेड– नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर हे देवगिरी एक्सप्रेसने उद्या शुक्रवार दि. आठ जूलै रोजी सकाळी ८.३० वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर ते दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली असून रेल्वे स्टेशन ते आ. कल्याणकर यांचे शिवालय जनसंपर्क कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर मतदारसंघात नेहमीच विकास कामात सक्रिय असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते. मागील राजकीय घडामोडीमध्ये आ. बालाजी कल्याणकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले. त्यानंतर घडलेले सत्तांतर आणि एकूणच या बंडानंतर आ. कल्याणकर हे उद्या दि. ८ रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांचे देवगिरी एक्सप्रेसने नांदेडला येत आहेत. या बंडाच्या पार्श्वभूमीवर सर्व बंडखोर आमदारांना केंद्र सरकारच्यावतीने खास सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कडक पोलीस बंदोबस्तही असण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. रेल्वे स्थानक ते आ. कल्याणकर यांचे शिवालय जनसंपर्क कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम तसेच तळणीचे सरपंच वैजनाथ सूर्यवंशी, सायाळचे उपसरपंच होणाची जामगे, पिंपरी महीपालचे सरपंच हनुमान चंदेल, वाढवणा खडकीचे सरपंच संजय पोह रे, उपसरपंच नागोराव कदम, निळ्याचे सरपंच रोहित हिंगोले, पोखरणीचे सरपंच सचिन पाटील, धानोराचे सरपंच बालाजी पोपळे, मुन्ना राठोड, राजू गुडावार, मनोज ठाकूर, शक्तीसिंह ठाकुर, संतोष मादमवाड, सुगावचे उपसरपंच अनिल शिंदे, संतोष भारसवडे, नवनाथ काकडे, विनायक बोकारे, गणेश बोकारे, बालाप्रसाद शिंदे, महेश नवले, गिरधारी जोगदंड, अमृत भारसावडे, राजदीप पावडे, रामेश्वर शिंद, बालाजी पावडे, माधवराव कल्याणकर, दिगंबर कल्याणकर, प्रणव बोडके, श्याम वन, धनंजय पावडे, दीपक भोसले, लोकेश सातीर, गोविंद भुरे, गजानन धुमाळ, विजय कदम, नागेश जनकवाडे, संतोष जाधव, सुदीप देशमुख यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻