Saturday, April 20, 2024

बदली आदेश मिळताच जिल्हाधिकारी डॉ.इटनकर तात्काळ झाले कार्यमुक्त; अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा पदभार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नांदेड येथून नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. गुरुवार दि. 18 ऑगस्ट रोजी हे बदली आदेश प्राप्त होताच डॉ. इटनकर हे तात्काळ कार्यमुक्त झाले.

डॉ विपीन इटनकर यांनी कार्यमुक्त होण्यापूर्वी  जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शासनाने डॉ. इटनकर यांचे नांदेड येथून नागपूरला बदली आदेश काढताना नांदेड येथे मात्र कोणाच्याही नियुक्तीचे आदेश काढले नाहीत. विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे आपल्या पदाचा कार्यभार सोपवून आपण नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे डॉ. इटनकर यांना आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे कार्यभार सुपूर्द करुन ते गुरुवारीच नागपूरला रवाना झाले.

दरम्यान, सरकारने दोन दिवसांत नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे येथील महिला आणि बालकल्याणचे आयुक्त राहुल महिवाल यांची पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेन्ट अॅथॉरिटीच्या (पीएमआरडीए) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांना पुण्याच्या महिला आणि बालकल्याणच्या आयुक्त करण्यात आले आहे. एमएमआरडीएचे सहआयुक्त राहुल कर्डिले यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी जयश्री भोज व शेखर सिंग यांच्यासह अन्य तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची बदली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या संचालकपदावर करण्यात आली. तर, पिंपरी-चिंचवडच्या महापालिका आयुक्तपदी शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. तर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली.

हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक मदन नागरगोजे यांची लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. तर, सुमन चंद्रा यांची हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!