Wednesday, February 8, 2023

बस चालकाची अचानक तब्येत बिघडल्यानंतर एसटी बस थेट रस्त्याच्या खाली उतरली; पाच प्रवासी जखमी, मोठा अनर्थ टळला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- बस चालवत असतानाच बस चालकाची तब्येत अचानक बिघडल्यानंतर ही बस रस्त्यावरून थेट खाली उतरल्याचा प्रकार आज सोमवारी काकांडी जवळ घडला. ही बस नांदेडवरुन जिल्ह्यातील लाडका गावाकडे निघाली होती. या घटनेत पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मोठा अनर्थ टळला आहे. सदर घटना आज सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

नांदेड आगारातील बस (एमएच२०- डिएल- ६६२) ही बस नांदेडहून लाडका या गावाकडे प्रवासी घेवून जात होती. सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान काकांडी पुलाजवळ या बसच्या चालकाला अचानक चक्कर आल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरुन खाली घसरली. बस सरळ शेतात जाऊन थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदरील घटनेत बसमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत धाव घेऊन प्रवाशांना मदत केली. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,707FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!