Friday, July 19, 2024

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी मध्यप्रदेशातील उज्जैनच्या दोन जणांना अटक; आरोपींची संख्या 11 वर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- दिल्ली कारागृहात असलेल्या मध्यप्रदेशातील उज्जैनच्या दोघांना नांदेड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. शनिवार दि. ११ जून रोजी त्यांना रितसर अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एम. आर. सोवानी यांनी 15 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. यापूर्वीचे नऊ आरोपी आणि हे दोन अशी आता या प्रकरणात आरोपींची संख्या 11 वर पोहोचली आहे.

नांदेडच्या शारदानगर भागात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तब्बल 55 दिवसानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. एकेक करता करता तब्बल आरोपींची संख्या अकरा वर पोहोचली आहे. विशेष तपास पथकाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व तपास पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू केला.

गुन्ह्यात वापरलेली व आरोपींनी जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेली पल्सर दुचाकी पोलिसांनी जप्त केली. यापूर्वी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक करून ते सध्या 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. याच प्रकरणाशी संबंधित असलेले व सध्या दिल्ली कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात स्थानबद्ध असलेले मध्यप्रदेश उज्जैन येथील राजपालसिंग ईश्वरसिंग चंद्रावत (वय 29) आणि योगेश कैलासचंद भाटी या दोघांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नांदेड पोलिसांनी दोन दिवसापूर्वी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना नांदेडला आणण्यात आले. दीपक नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून संजय बियाणी यांची हत्या करणार असल्याचे त्यांच्याकडून पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. हे दोघेजण यापूर्वी नांदेडला येऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, सचिन सोनवणे यांनी चोख बंदोबस्तात या दोघांना न्यायालयासमोर हजर केले. सरकार पक्षाच्यावतीने अडवोकेट जी. एस. वाघमारे यांनी हे दोन्ही आरोपी नांदेड नांदेडमध्ये कुठे थांबले, कोणाच्या संपर्कात होते, कोणत्या वाहनातून शहरात फिरत होते, त्यांच्याकडून पिस्टल जप्त करणे बाकी आहे असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. न्यायालयाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत व आरोपींची पार्श्वभूमी लक्षात घेता 15 जून पर्यंत राजपालसिंग चंद्रावत आणि योगेश भाटी या दोघांना पोलीस कोठडीत पाठवले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!