Friday, March 29, 2024

बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या गोदामाला आग; विद्यार्थ्यांसाठीचे साहित्य जळून खाक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट – येथील बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या गोदामाला आज गुरुवार, दि. ६ जानेवारी रोजी लागलेल्या आगीत बालकांचे साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 

येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचे गोदाम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आहे.बसदर गोदामाच्या पाठीमागच्या बाजूने भगदाड पडले आहे. या गोदामाला गुरुवारी दुपारी आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत बालकांसाठी असलेले साहित्य तसेच इतर कागदपत्रे जळाली असल्याचे सांगण्यात येते. आग विझवण्यासाठी पालिकेचे अग्निशमन दल आले होते. त्यापूर्वीच शिवसेनेचे मारूती दिवसे, मनसेचे नितीन मोहोरे, शेख रफीक शेख महेबूब यांनी गोदामाचे शटर तोडून आग विझवण्यासाठी मदत केली. त्यांनी जमेल तितके साहित्य बाहेर काढले.

या आगीत घसरगुंडी, पाळणे, चटई, ग्रीनबोर्ड, पाट्या, खेळणे असे  हजारो रुपयांचे प्लास्टीक साहित्य मोठ्या प्रमाणात जळाले आहे. गटविकास अधिकारी सुभाष धनवे, बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष साजीद खान, श्रीनिवास नेम्मानीवार आदींनी दुर्घटनास्थळी भेट दिली. आगप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष साजीद खान यांनी केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!