Tuesday, December 3, 2024

बाळासाहेब आंबेडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने केली निदर्शने

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नविन नांदेड- ओबीसी आरक्षणसाठी मुंबई येथे काढण्यात आलेल्या जाहीर मोर्चा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना मुंबई पोलीसांनी विधानभवन भवनजवळ अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ नांदेड वंचित बहुजन आघाडी दक्षिण च्या वतीने महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड व सुदर्शन कांचनगिरे यांच्या नेतृत्वाखाली रमामाता आंबेडकर चौक येथे निदर्शने करण्यात आली. या वेळी महाविकास आघाडीच्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने ओबीसी आरक्षणसाठी विधानभवनावर दि.२३ डिसेंबर रोजी मुंबई येथे जाहीर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबई पोलिसांनी बाळासाहेब आंबेडकर यांना अटक केल्याचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी दक्षिण नांदेडच्या वतीने २३ डिसेंबर रोजी रमामाता आंबेडकर चौक येथे दुपारी ३ वाजता निदर्शने करण्यात आली आहे.

यावेळी महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,  युवा नेते सुदर्शन कांचनगिरे,  महानगर महासचिव अमृत नरंगलकर, जिल्हा उपाध्यक्ष रवि पंडीत, जिल्हा संपर्क प्रमुख मुन्ना ऊर्फ इंद्रजित पांचाळ, युवा नेते श्याम नायगावे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गजभारे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचा निषेध व्यक्त करून बाळासाहेब आंबेडकर यांच्यी सुटका लवकरात लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासनाचा निषेध व्यक्त करून घोषणाबाजी केली.

यावेळी नामदेव सोनकांबळे, सल्लागार साहेबराव भंडारे,अनिल शिरसे, पंडित सोनकांबळे, माधव पाटील जाधव,वैभव लषकरे, यशवंत गोणारकर, गोपालसिह टाक, अक्षय गजभारे, महेंद्र सोनकांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व उपनिरीक्षक केंद्रे पोलीस अंमलदार शिंदे, गोपनीय शाखेचे दंतापले बि.एम व शोध पथकाचे जाधव, सत्तार यांनी यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!