Monday, December 11, 2023

बिल्डरचे ऑफीस फोडून २२ लाख चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात; दोन आरोपीसह नगदी १७ लाख रुपयेही जप्त

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नांदेड- शहरातील प्रसिद्ध बिल्डर सतीश माहेश्वरी यांच्या सन्मान प्रेस्टीज येथील ऑफीसमध्ये बाथरुमच्या खिडकीतुन आत प्रवेश करुन अज्ञात आरोपीतांनी नगदी 22 लाख 15 हजार 470 रुपये चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून नगदी १७ लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत.

या चोरीप्रकरणी नंदकुमार जळबाजी गाजुलवार, रा. चौफाळा यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात  गुन्हा दाखल होता. स्थागुशाच्या पथकाने घटनास्थळ व आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज हस्तगत करुन त्याचे अॅनालीसीस करुन तसेच गूप्त बातमीदारांना नेमुन अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला होता. सन्मान प्रेस्टीज येथे घर फोडी करणारे आरोपी मुदखेड येथे असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तशी माहीती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिल्यानंतर त्यांनी चिखलीकर यांना पथक तात्काळ रवाना करण्याबाबत आदेशीत केले. त्यानंतर पो नि स्थागुशा यांनी स्थागुशाचे अधिकारी व अंमलदार यांना रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार मुदखेड रेल्वेस्टेशन परीसरात जावून संशयित आरोपींचा शोध घेवून रेल्वे स्टेशन परीसरातुन आरोपी शिवदास पुरभाजी सोनटक्के (वय 21, रा. बागमार गल्ली, मुदखेड, जिल्हा नांदेड), अंकुश पांडूरंग मोगले (वय 20, रा. धनगरगल्ली, मुदखेड, जिल्हा नांदेड) हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवून गुन्ह्या संबंधाने कसून विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्ह्यातील मुद्देमालासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी चोरलेली रक्कम त्यांच्या घरी मुदखेड येथे असल्याचे सांगितल्याने आरोपी शिवदास पुरभाजी सोनटक्केकडुन 13 लाख 41 हजार 400 रुपये व आरोपी अंकुश पांडूरंग मोगले याच्याकडुन 4 लाख रुपये नगदी अशी एकुण 17 लाख 41 हजार 400 रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. नमुद दोन्ही आरोपीतांना गुन्हयातील रक्कमेसह पुढील तपासकामी पोलीस ठाणे वजिराबाद यांचे ताब्यात देण्यात आले असुन नमुद आरोपीतांकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, अशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहु, सपोउपनि  संयज केंद्रे, पोहेकॉ  गुंडेराव करले, गंगाधर कदम, शंकर म्हैसनवाड, सखाराम नवघरे पो ना अफजल पठाण, विठल शेळके, पो कॉ देविदास चव्हाण, तानाजी येळगे, गणेश धुमाळ, चालक पोकों कलीम, हेमंत बिचकेवार, महिला पोह पंचफुला फुलारी सायबर सेल चे पोह दिपक ओढणे, राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!