Tuesday, October 15, 2024

भरधाव मालवाहू ट्रेलरने बैलगाडीला उडवले, युवक जागीच ठार; बैलाचाही मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- भरधाव मालवाहू ट्रेलरने बैलगाडीला उडवल्याची घटना लोहा तालुक्यात घडली असून यात युवक जागीच ठार झाला आहे. तर बैलगाडीला जुंपलेल्या बैलाचाही यात मृत्यू झाला आहे.

लोहा तालुक्यातील गोळेगाव शिवारातील शेताकडून घराकडे निघालेल्या बैलगाडीला भरधाव वेगातील ट्रेलरने धडक दिली. यात सोळा वर्षीय युवकासह एक बैल जागीच ठार झाला. तर इतर एक तरुण आणि म्हैस यात जखमी झाले. हा अपघात लोहा तालुक्यातील हिंदोळा ते गोळेगाव रस्त्यावर घडला.

लोहा तालुक्यातील गोळेगाव येथे राहणारे शाहूराज आबाजी ढाले यांचा मुलगा मच्छिंद्र ढाले, नातू मयूर मच्छिंद्र ढाले ( वय १५ ) आणि राजेश रघुनाथ ढाले (वय १६) आणि त्यांचा शेजारी संभाजी भुजंगा शिराळे हे चौघेजण सायंकाळी सातच्या सुमारास शेतातून जनावरांसाठीचा चारा बैलगाडीत टाकून बैलगाडीत बसून गोळेगावकडे निघाले होते. यावेळी गोळेगावकडून भरधाव वेगात येणारा एमएच26 बी ४०८० क्रमांकाच्या ट्रेलरने बैलगाडीला उडवले. यात राजेश रघुनाथ ढाले हा आणि बैलगाडीचा एक बैल जागीच ठार झाले तर मच्छिंद्र ढाले आणि बैलगाडीला मागे बांधलेली म्हैस गंभीर जखमी झाली आहे.

जखमी युवकावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शाहूराज ढाले यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात जवळपास एक लाख 65 हजाराचे आर्थिक नुकसान झाल्याचीही पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!