Wednesday, July 24, 2024

भाजपची जम्बो प्रदेश कार्यकारिणी: डॉ. गोपछडे प्रदेश उपाध्यक्षपदी, कौडगे मराठवाडा संघटक; चैतन्यबापू, सूर्यवंशी कार्यकारिणीवर; तर नांदेडमधून १५ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ डॉ. किन्हाळकर, देशमुख, साबणे, भोयर, कुंटुरकर, सुमठाणकर, बिसेन, केंद्रे, खोमणे, बच्चेवार आदी १५ विशेष निमंत्रित सदस्य

नांदेड– भाजपची जम्बो प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर झाली आहे. यात नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर संजय कौडगे यांना मराठवाडा संघटकपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर चैतन्यबापू देशमुख आणि अशोक सूर्यवंशी यांची प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली असून देवीदास राठोड यांच्यावर चिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नांदेडमधून १५ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

◆ डॉ. अजित गोपाछडे (प्रदेश उपाध्यक्ष)
◆ संजय कौडगे (मराठवाडा संघटक)
◆ देवीदास राठोड (प्रदेश चिटणीस)
प्रदेश कार्यकारिणी सदस्य- चैतन्यबापू देशमुख (नांदेड शहर) आणि अशोक सूर्यवंशी (नांदेड ग्रामीण) या दोघांची वर्णी लागली आहे. तर नांदेडमधून १५ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष निमंत्रित सदस्य: माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, डॉ. धनाजीराव देशमुख, सुधाकर भोयर, अजयसिंह बिसेन, राजेश देशमुख कुंटुरकर, मिलिंद देशमुख, माणिकराव चव्हाण मुकादम, महेश खोमणे, रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार सुभाष साबणे, बालाजी बच्चेवार, चंद्रशेखर कदम, बाबुराव केंद्रे, जनार्दन ठाकूर, धर्मराज देशमुख यांची या प्रदेश कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!