Thursday, September 19, 2024

भाजपच्यावतीने लातूरमध्ये ‘द-कश्मीर फाईल्‍स’ टॅक्स फ्री ! माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचा पुढाकार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर :- बहुचर्चित ‘द-कश्मीर फाईल्‍स’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची भाजपची मागणी आहे. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत लातूर भाजपने नामी शक्कल लढवली आहे. टॅक्स फ्री दरात प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी दिवसभरात विक्री झालेल्या तिकिटांचा टॅक्स भाजपाच्‍यावतीने चित्रपटगृहाच्‍या मालकाकडे दिला जाणार असल्याची घोषणाच भाजप नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. त्यामुळे लातूरमध्ये भाजपच्यावतीने ‘द-कश्मीर फाईल्‍स’ हा चित्रपट टॅक्स फ्री दरात बघता येणार आहे. 

केवळ भारतातच नव्‍हे तर सातासमुद्रापार द-कश्मीर फाईल्‍स या चित्रपटाची चर्चा आहे. कश्मिरमध्‍ये ९० च्‍या दशकात हिंदु आणि कश्मिरी पंडित यांच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचारावर हा चित्रपट आधारित आहे. याची माहिती प्रत्येक भारतीयाला व्हावी म्हणून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची भाजपची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखविल्याचा आरोप भाजपने केलाय. तरीही जास्तीत जास्त भारतीयांनी हा चित्रपट पहावा यासाठी लातूर भाजपच्यावतीने हा चित्रपट टॅक्स फ्री दरात दाखविण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. ते लातूरमध्ये भाजप लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसोबत  पीव्हीआर सिनेमागृहात ‘द-कश्मीर फाईल्‍स’ हा चित्रपट पाहण्यास आल्यानंतर बोलत होते.

देशातील प्रत्येक नागरिकाने हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. देशातील अनेक राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार त्याबाबत अनुकूल नसल्यामुळे भाजपच्यावतीने लातूरमध्ये टॅक्स फ्री केल्याचे ते म्हणाले. दिवसभरात हा चित्रपट जितके प्रेक्षक तिकीट खरेदी करून पाहतील, त्या तिकिटांचा टॅक्स चित्रपटगृहांच्या मालकांकडे भाजपच्यावतीने जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याकरिता चित्रपटगृह व्यवस्थापनाकडे आगाऊ रक्कमही जमा करण्यात आल्याचेही निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

हा चित्रपट पाहण्यासाठी भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह, माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्‍य शैलेश लाहोटी, प्रदेश भाजयुमोच्‍या सचिव प्रेरणा होनराव, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, मनपा गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे, शहर महिलाध्‍यक्षा मीना भोसले  यांच्‍यासह शहर जिल्‍हयाचे पक्ष पदाधिकारी, मनपा नगरसेवक , बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होते.

चित्रपट संपल्‍यानंतर उपस्थितांनी दोन मिनिट स्‍तब्‍ध उभे राहून कश्मिरमध्‍ये बळी पडलेल्‍या नागरिकांना श्रध्‍दांजंली अर्पण केली. त्यानंतर भारत माता की जय, वन्‍दे मातरम या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन गेले होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!