Thursday, February 9, 2023

भाजपने केली लोहा तालुकाध्यक्षाची पदावरून हकालपट्टी 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ शरद पवारांची हकालपट्टी; नूतन तालुकाध्यक्षपदी आनंदराव शिंदे यांची निवड

नांदेड– भारतीय जनता पार्टी लोहा तालुका अध्यक्ष शरद नामदेवराव पवार यांना वारंवार सूचना देऊनही पक्षाशी गद्दारी करण्याचा प्रकार त्यांनी सोडला नाही. त्यामुळे अखेर पक्षश्रेष्ठींनी गद्दार शरद पवार यांची लोहा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे भाजप जिल्हा शाखेने जाहीर केले आहे. याच वेळी नूतन तालुका अध्यक्ष म्हणून आनंदराव शंकरराव शिंदे यांची निवड जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर यांनी जाहीर केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे लोहा तालुका अध्यक्ष शरद नामदेवराव पवार यांनी पक्षाशी सतत गद्दारी केली. त्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली मात्र त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. सतत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या शरद पवार यांची अखेर तालुका अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे भाजप जिल्हा शाखेने म्हटले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष पदावर आनंदराव शंकरराव शिंदे यांची निवड करण्यात आल्याचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी जाहीर केले. निवडीचे पत्र गोजेगावकर यांनी शिंदे यांना सुपूर्द केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,706FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!