Monday, December 11, 2023

भाजप नगरसेवकांनीच भाजप उपनगराध्यक्षास पायउतार केले; लोहा नगर पालिकेतील अविश्वास ठराव नाट्य

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ कालच करण्यात आली होती पक्षातील पदावरून हकालपट्टी

लोहा (जि. नांदेड)- लोहा नगर पालिकेचे भाजपच्या उपाध्यक्षांनी ठरल्याप्रमाणे मुदतीत उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्यामुळे आज मंगळवार दि. २९ रोजी लोहा नगरपलिकेत विशेष सभा घेण्यात आली. यात भाजपचे उपनगराध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपच्याच नगरसेवकांनी १२ मतांनी अविश्वास ठराव पारित करीत त्यांना पदावरून पायउतार केल्याचा प्रकार पहावयास मिळाला.

लोहा नगरपालिकेत भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व १७ पैकी १३ सदस्य आहेत. तर काँग्रेस पक्षाकडे ४ सदस्य आहेत. २०१८ मध्ये झालेल्या पालिका निवडणूकीत लोह्यातील मतदारांनी खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला स्पष्ट बहुमत दिले. उपाध्यक्ष पदासाठी नगरसेवक मंडळीत प्रारंभी जोरदार रस्सीखेच होती. त्यामुळे खा. चिखलीकर यांनी उपाध्यक्षपद हे सव्वा- सव्वा वर्षे विभागून देण्याचे ठरवले. यात प्रारंभी उपाध्यक्षपद हे केशवराव चव्हाण यांना देण्यात आले. त्यांनी ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाळ होताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर सव्वा वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात उपाध्यक्षपदावर नगरसेवक शरद पवार यांची वर्णी लागली. पण सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर देखील पवार हे राजीनामा देण्यास तयार नव्हते. इतर नगरसेवक मंडळींनी खा. चिखलीकर यांची भेट घेवून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चिखलीकर यांनी शरद पवार यांना वेळोवेळी सूचना दिली. तरीही त्यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे शेवटी भाजप नगरसेवकांनी रितसर अविश्वास ठराव आणल्यानंतर आज मंगळवार दि. २९ रोजी सकाळी अकरा वाजता नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. त्यात एकूण १३ पैकी १२ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले व बहुमताने हा ठराव पारित झाला.

सदरील बैठकीस स्वतः उपनगराध्यक्ष शरद पवार व नगरसेवक बालाजी शेळके हे अनुपस्थित राहिले. तर काँग्रेसच्या सर्व चारही नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. लोहा नगर पालिकेत अविश्वास ठराव संमत करण्यासाठी जि. प. सदस्य तथा भाजपचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यासह नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, भाजपचे गटनेते करीम शेख, नगरसेवक दता वाले, भास्कर पाटील, युवा कार्यकर्ते सचिन मुकदम, प्रवीण धुतमल, सूर्यकांत गायकवाड, अनिल धुतमल, नामदेव चव्हाण आदींनी अविश्वास ठराव पास होण्यासाठी मेहनत घेतली. कालच शरद पवार यांची लोहा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे भाजप जिल्हा शाखेने जाहीर केले होते. तसेच नूतन तालुका अध्यक्ष म्हणून आनंदराव शंकरराव शिंदे यांची निवड जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर यांनी जाहीर केली होती.

भाजपा गटनेता करीम शेख यांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजवला होता. यावेळी पळवा पळवी, फोडाफोडी व पैशांची देवाण घेवाण होण्याची शक्यता बोलली जात होती.पण तसे काही न होता, अविश्वास ठराव बहुमताने पारित झाला. या निमित्ताने खा. चिखलीकर यांनी लोहा पालिकेवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!