Friday, March 29, 2024

भारत जोडो यात्रेनिमित्त नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे आज तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेनिमित्त शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गुरुवारी नांदेड मध्यवर्ती बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. सिडको भागातील वसंतराव नाईक कॉलेज मैदान, डेअरी चौक वसरणी येथे तात्पुरत्या स्वरूपात मध्यवर्ती बसस्थानक सुरू करण्यात आले आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेनिमित्त गुरुवार, दि. १० नोव्हेंबर रोजी शहराच्या नवीन मोंढा मैदान येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी शहरांमध्ये जनसमुदाय व वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून नांदेडमधील मध्यवर्ती बसस्थानक बंद ठेवून सदरील बसस्थानकावरून जाणाऱ्या व येणाऱ्या फेऱ्यांची वाहतूक शहराबाहेर तात्पुरते बसस्थानक उभारून त्या ठिकाणाहून करण्यात येणार आहे.

राज्य परिवहन बसेसची वाहतूक शहाराबाहेरून करण्याच्या पोलीस प्रशासनाकडून सूचना मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने १० नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या बसेसच्या वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद राहणार असून मध्यवर्ती बसस्थानकावरून होणारी बसेसची वाहतूक ही वसंतराव नाईक कॉलेज मैदान, डेअरी चौक, वसरणी, नांदेड येथून करण्यात येणार आहे.

◆लोहा, सोनखेडकडे जाणारी व येणारी वाहतूक आंबेडकर चौक, विष्णुपुरी या मार्गाने करण्यात येणार आहे.
◆मुखेड, देगलूर, बिलोलीकडे जाणारी व येणारी वाहतूक किवळा- शिराढोण- तेलूर फाटा- कवठा या मार्गाने करण्यात येणार आहे.
◆भोकर, किनवट, हदगाव, माहूर, हिंगोली, वसमतकडे जाणारी व येणारी वाहतूक लातूर फाटा (धनेगाव चौक) बायपास मार्गाने शंकरराव चव्हाण चौक आसनापूल या मार्गाने करण्यात येणार आहे.

उपरोक्त मार्गावर प्रवाशांच्या माहिती करिता प्रवासी मित्रांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांच्याद्वारे प्रवाशांची चढ-उतार करण्यास मदत करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन विभागाचे नांदेड विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!